Pahalgam Terror Attack : आतंकवाद आज घरात आला… पहलगाम हल्ल्यात प्रवीण तरडेंनी गमावली जवळची व्यक्ती

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत. या हल्ल्यामुळे लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडेही हादरले आहेत. त्यांनी जवळची व्यक्ती या हल्ल्यात गमावली आहे.

Pahalgam Terror Attack : आतंकवाद आज घरात आला... पहलगाम हल्ल्यात प्रवीण तरडेंनी गमावली जवळची व्यक्ती
प्रवीण तरडेंनी गमावला जवळचा माणूस
Image Credit source: social media
| Updated on: Apr 23, 2025 | 1:58 PM

काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाने पुन्हा डोकं वर काढलं असून काल पहलगाममध्ये काल दहशतवाद्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर भ्याड हल्ला करत 26 जणांचा बळी घेतला. मृत्यूच्या या रक्तरंजित खेळामुळे अख्खा देश हादरला असून मृतांमध्ये भारतीयांचा तसेच परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांना घेरून, 6-7 दहशतावाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, धर्म विचारून त्यांना गोळी मारण्यात आली असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

दरम्यान या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पुण्याच्य 2, डोंबिवलीचे 3 तर नवी मुंबईतील एका पुरूषाचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली असून सामान्य नागरिकांपासून ते खेळाडू, सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान या हल्ल्यामुळे लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडेही हादरले आहेत. मोठ्या पडद्यावर अभिनयाने सर्वांना स्तिमित करणारे, दिग्दर्शनाची जादू दाखवणारे प्रवीण तरडे यांनीही या हल्ल्यात अत्यंत जवळचा माणूस गमावला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रवीण तरडेंनी त्यांच्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्या व्यक्तीची माफीदेखील मागितली आहे.

प्रवमी तरडेंनी गमावला जवळचा मित्र

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत. मृतांमध्ये पुण्याचे संतोष जगदाळे यांचाही समावेश असून त्यांना त्यांच्या मुलीसमोर , बायकोसमोरच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. जखमी जगदाळेंवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत संतोष जगदाळे आणि प्रवीण तरडे यांचा अत्यंत जवळचा संबंध होता. प्रवीण तरडे यांनीच एक पोस्ट लिहीत आपला जवळचा मित्र गमावल्याचे नमूद केलं. त्या मृत मित्राची त्यांनी माफीही मागितली.

प्रवीण तरडे यांची पोस्ट

आतंकवाद आज घरात आला.. माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला.. मित्रा संतोष माफ कर आम्हाला, आम्ही काही करू शकत नाही… अशी उद्विग्न पोस्ट लिहीत प्रवीण तरडे यांनी ही दु:खद बातमी सर्वांना सांगितली आणि जगदाळे यांची माफीही मागितली.

त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ” पहलगाममधील हल्ल्याच्या ठिकाणी दोन हजारांवर पर्यटक होते, पण सुरक्षेसाठी एकही पोलिस तैनात नव्हता…
‘सैन्य भरती थांबवून आपल्या सैन्याचा आकार 1 लाख 80 हजारांनी कमी केला, ही कोणाची बुद्धिमानी आयडिया’?” अशी कमेंट एकाने लिहीली. तर काय बोलू सर यावर… जो गमावतो..त्यालाच त्याची किंमत कळते, असे लिहीत आणखी एका युजरने सहवेदना व्यक्त करत तरडे यांचं सांत्वन केलं.

ते गोळ्या चालवतील क्रूर होतील धर्मांध म्हणून त्यांना गोंजारले जाईल.. आपण फक्त candal मार्च काढायचा….खरेदी करताना टाळा… म्हणजे पोटात उठेल गोळा….धर्म होईल पालापाचोळा…..किमान जमल तर करा… इस्त्राईल कडून शिकावं…., अशी कमेटंही एकाने या पोस्टवर केली आहे.