वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय!; वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर प्रश्न विचारताच अभिनेता संतापला

सध्या वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता हगवणेंच्या वकिलाने केलेल्या युक्तीवादानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय!; वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर प्रश्न विचारताच अभिनेता संतापला
Hemant Dhome and Vaishnavi Hagavane
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 29, 2025 | 12:43 PM

पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे या महिलेने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून स्वत:ला संपवले. 16 मे रोजी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या वडिलांनी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांना अटक केली आहे. दरम्यान, हगवणे कुटुंबीयांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने केलेल्या युक्तिवादावर सर्वांनी संताप व्यक्त केला आहे.

वकिलाने काय आरोप केले?

वैष्णवीचा मानसिक छळ करुन मारहणार करणाऱ्या हगवणे कुटुंबीयांची कोर्टात केस सुरु आहे. त्यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची तिचे चॅट पकडले असा संतापजनक दावा हगवणेच्या वकिलांनी केला. वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यासोबतच तिची प्रवृत्तीच आत्महत्या करणारी होती, असंही हगवणेंचे वकील म्हणाले आहेत. ते ऐकून पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.

वाचा: मृत्यूनंतर श्रीदेवीच्या तोंडात ठेवण्यात आला सोन्याचा तुकडा, काय होते कारण?

काय म्हणाला हेमंत ढोमे?

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. त्याने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरची एक पोस्ट रिशेअर केली आहे. ‘एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हरॅसमेंट ठरत नाही, राजेंद्र हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट रि-पोस्ट करत हमेंतने, ‘वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय! बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे. कठीण आहे!’ असे म्हटले आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी हेमंतला पाठिंबा दिला आहे. त्याचे एकदम योग्य आहे असे देखील म्हटले आहे.