AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूनंतर श्रीदेवीच्या तोंडात ठेवण्यात आला सोन्याचा तुकडा, काय होते कारण?

अभिनेत्री श्रीदेवी यांचे अंत्यसंस्कार विधिवत पद्धतीने पार पडले. त्यांच्या तोंडात सोने ठेवण्यात आले होते. त्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

मृत्यूनंतर श्रीदेवीच्या तोंडात ठेवण्यात आला सोन्याचा तुकडा, काय होते कारण?
ShrideviImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 27, 2025 | 5:45 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांची लोकप्रियता एखाद्या पुरुष सुपरस्टारच्या तोडीसतोड होती. चित्रपटसृष्टीत त्यांना ‘लेडी अमिताभ बच्चन’ असेही संबोधले जायचे. मात्र, ही दिग्गज अभिनेत्री आता आपल्यात नाही. सुमारे सात वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली होती आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांना शेवटच्या क्षणी एखाद्या नवरी सारखे सजवण्यात आले होते आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला लाखो लोकांची गर्दी जमली होती.

श्रीदेवी यांचे अंत्यसंस्कार विधिवत पद्धतीने पार पडले. त्यांच्या अंत्यसंस्कारातील प्रत्येक विधी काळजीपूर्वक पार पाडला गेला. पण तुम्हाला माहीत आहे का की, श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तोंडात सोन्याचा तुकडा ठेवण्यात आला होता? यामागे एक विशेष कारण आहे. चला, याबद्दल जाणून घेऊया. वाचा: प्रसिद्ध मॉडेलचा कारनामा! 6 तासात 583 पुरुषांसोबत शारीरिक संबंध, शेवटी उचलून हॉस्पिटमध्ये घेऊन गेले

श्रीदेवी यांच्या तोंडात सोन्याचा तुकडा का ठेवला गेला?

श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तमिळनाडूतील मीनामपट्टी येथे झाला होता. त्यांचे निधन 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत झाले. श्रीदेवी यांना अंतिम निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तोंडात सोन्याचा तुकडा ठेवला होता. तमिळ परंपरेनुसार, सवाष्णीच्या मृत्यूनंतर तिच्या तोंडात सोन्याचे पान किंवा सोन्याचा तुकडा ठेवला जातो. याच कारणामुळे श्रीदेवी यांच्या तोंडातही सोन्याचा तुकडा ठेवण्यात आला होता.

मुलगी जान्हवीचा डेब्यू चित्रपट श्रीदेवी पाहू शकल्या नाहीत

ज्या वर्षी श्रीदेवी यांचे निधन झाले, त्याच वर्षी त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जान्हवी आपल्या आईच्या खूप जवळ होती. जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान श्रीदेवी नेहमी आपल्या मुलीच्या सोबत असायच्या. पण त्यांना त्यांच्या मुलीचा डेब्यू चित्रपट पाहता आला नाही.

श्रीदेवी यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला, तर जान्हवीचा डेब्यू चित्रपट ‘धडक’ जुलै 2018 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसला होता. आता श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिनेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. खुशीने 2023 मध्ये ‘द आर्चीज’ या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केले, ज्याचे दिग्दर्शन जोया अख्तर यांनी केले होते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.