मोठी बातमी! दिशा सालियानच्या वडिलांनी दिलेल्या 500 कोटींच्या नोटिशीला अखेर आदित्य ठाकरेंकडून उत्तर, नेमकं काय म्हटलं?

दिशा सालियान प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियानचे वडील सतिश सालियान यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना 500 कोटींची नोटीस पाठवली होती. या नोटीसीला अखेर आता आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

मोठी बातमी! दिशा सालियानच्या वडिलांनी दिलेल्या 500 कोटींच्या नोटिशीला अखेर आदित्य ठाकरेंकडून उत्तर, नेमकं काय म्हटलं?
aditya thackeray
Image Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Sep 23, 2026 | 7:26 PM

दिशा सालियान प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियानचे वडील सतिश सालियान यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना 500 कोटींची नोटीस पाठवली होती. या नोटीसीला अखेर आता आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आदित्य ठाकरेंकडून सतिश सालियान यांच्या कायदेशीर नोटिशीला उत्तर देण्यात आलं आहे.आदित्य ठाकरे यांच्या वकिलांकडून या नोटिशीला उत्तर देण्यात आलं आहे. सतिश सालियान यांनी पाठवलेल्या 500 कोटींच्या  नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं? 

नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले आहेत. 16 सप्टेंबरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतिश सालियान यांचं नाव कुठेही घेतलेलं नाही, असा दावा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे.  पोस्टमधील कोणतंही विशिष्ट वाक्य सतीश सालियान यांच्याकडे निर्देश करत नसल्याचंही त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केलं आहे.

संबंधित प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांवर अधिकृत तपास होण्याची गरज आहे. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सतिश सालियान यांच्याविरोधात बदनामीचा कोणताही हेतू नसल्याचंही यावेळी आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. 26 पानांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी सतिश सालियान यांच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. सतिश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

सध्या दिशा सालियान प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात दिशा सालियानचे वडील सतिश सालियान  यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह काही जणांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर सतिश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांच्या मानहाणीची नोटीस देखील पाठवली होती. या नोटिशीला अखेर आता आदित्य ठाकरे यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आहे, आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us