बाळासाहेब गेल्यानंतर पक्षात… कोर्टात सुनावणी सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

बाळासाहेब गेल्यानंतर पक्षात... कोर्टात सुनावणी सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
Eknath Shinde Shivsena Case
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 6:06 PM

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षात निवडणुका होत नव्हत्या. मनमानी सुरू होती असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शिवसेनेच्या सर्व राज्य प्रमुखांची भेट घेत आगामी काळातील रणनीतीवर चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या सुनावणीवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, शिवसेनेची बाजू मांडण्यास सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांची घटना, बाळासाहेबांचे विचार नंतर कसे पायदळी तुडवले हे संपूर्ण राज्याने पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांची घटनाही बदलली, त्यांचे विचारही बदललेस सगळंच बदललं. त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले. जमतेचं जमनत गोठवलं. हिंदुत्वही गोठवलं. आता धनुष्यबाणही गोठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने जो काही निर्णय घेतला तो आपल्याला माहिती आहे. जनता आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आहे. त्यांना आम्हाला स्वीकारलं आहे, त्यांनी आशीर्वादही दिले आहेत.

बाळासाहेबांच्या नंतर…

पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला आहे. न्यायप्रविष्ठ प्रश्नावर जास्त बोलणार नाही. बाळासाहेबांच्या नंतर मनमानी होवू लागली होती. बाळासाहेबांची शिवसेना विचारधारेपासून दूर होवू शकतं नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे आहोत. जे संविधान धोक्यात असे गळा काढत आहेत, त्यांनी स्व:ताच्या पक्षात आत्मपरिक्षण केलं पाहिजे. बाळासाहेबांनी लोकशाही घडवली ती लोकशाही बुडवण्याचं काय यांनी केलं. हम करे सो कायदा असं त्यांनी केलेलं आहे. म्हणून ही परिस्थिती आहे. दरम्यान, आता पुढील सुनावणीत शिवसेनेकडून नेमका काय युक्तिवाद केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us