AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा महाभूकंप होणार? शरद पवारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे बड्या नेत्याला भेटले, गाडीतच 30 मिनिटं चर्चा

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं, त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, त्यामुळे राजकारणात काहीतरी मोठं घडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा महाभूकंप होणार? शरद पवारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे बड्या नेत्याला भेटले, गाडीतच 30 मिनिटं चर्चा
Eknath Shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 4:09 PM
Share

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल 34 वर्षांनी बुधवारी विधानभवनाला भेट दिली, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, राज्यभरात या भेटीची चर्चा सुरू असताना आणि भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शरद पवार यांच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदे आणि भापचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकाच वाहनातून प्रवास केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी तब्बल 30 मिनिटं वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. बुधवारी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे, पवार यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी एकाच वाहनातून प्रवास केला आहे.यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 30 मिनिटं राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर  आज रविंद्र चव्हाण यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी  एकत्र प्रवास केल्याने  मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाणे , नवी मुंबई, डोंबवली , पालघर आणि विविध राजकीय विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी 30 ते 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवारांनी घेतली शिंदेंची भेट 

दरम्यान त्यापूर्वी बुधवारी शरद पवार यांनी तब्बल 34 वर्षांनी विधानभवनाला भेट दिली, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या भेटीमागे कोणतंही राजकारण नाही, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु