‘नाना म्हणाले होते की, या विषयाबाबत आपण मोठ्या पवार साहेबांशी..’ नानांच्या मृत्यूनंतर आता राजकारण सुरु, रोहित पवारांचं पहिलं स्टेटमेंट

Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर हे अजातशत्रू व्यक्तीमत्व होतं. त्यांचे सर्व पक्षात मित्र होते. नाना पाटेकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता राजकारण सुरु झालेलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

नाना म्हणाले होते की, या विषयाबाबत आपण मोठ्या पवार साहेबांशी.. नानांच्या मृत्यूनंतर आता राजकारण सुरु, रोहित पवारांचं पहिलं स्टेटमेंट
| Updated on: Oct 08, 2026 | 2:13 PM

सागर सुरवसे, प्रतिनिधी : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं आज निधन झालं. आज सकाळी ही बातमी आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. असं काही घडेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. कारण नाना पाटेकरांच्या शरीरयष्टीकडे पाहिलं की ते फिट वाटायचे. अचानक नानांचं निधन कसं काय झालं? हे कसं होऊ शकतं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. नाना पाटेकरांच्या निधनानंतर समाजाच्या विविध वर्गातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. नाना पाटेकर हे सिनेमा क्षेत्रापुरताच मर्यादीत नव्हते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. राजकारण, समाजकारण अगदी गाव खेड्यापर्यंत त्यांचे मित्र होते. नाना पाटेकर यांची अकाली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. नाना पाटेकर यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य हे होतं की, ते समोरच्या माणसाला आपले वाटायचे.

आज नाना पाटेकर यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला. सध्या पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या विद्यार्थ्यांसमोर बोलताना आज रोहित पवार म्हणाले की, “तीन दिवसापूर्वी मी त्यांना फोन केला होता. एका मित्राच्या माध्यमातून त्यांना विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुम्हाला पाठिंबा द्यायला यावं लागेल, असं मी त्यांना म्हटलं होतं” “त्यावर तुला सांगायची गरज नाही. हे सर्व विद्यार्थी आपलेच आहेत, असं नाना पाटेकर म्हणाले होते” असा दावा रोहित पवार यांनी केला.

Loading...

‘नाना पाटेकर हे शरद पवारांना भेटणार होते’

रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. “आमदार रोहित पवारांनी नानांच्या निधनानंतर त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करणे उचित नाही. आमदार रोहित पवार यांच्या MPSC विदयार्थ्यांसोबतच्या आंदोलनामुळे व्यथित होऊन नाना पाटेकर हे शरद पवारांना भेटणार होते” असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष पाटील यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे. “रोहित पवारांचा आंदोलनाला भेट देण्याबाबत नानांना फोन आला होता. मात्र नाना म्हणाले होते की, या विषयाबाबत आपण मोठ्या पवार साहेबांशी बोलणार असून, रोहित पवारांना समज द्यावी, तसेच एखादे प्रकरण किती ताणावे याचाही विचार झाला पाहिजे. नानांच्या नावाने राजकारण नको, सत्य जनतेसमोर यायला हवे!” अशा आशयाची फेसबुक पोस्ट शिंदे गटाचे नेते संतोष पाटील यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us