आजोबाच्या भूमिकेनंतर नातू आमदार रोहित पवार आक्रमक, शिंदे सरकारवर निशाणा साधत यापुढं शांत बसणार नाही म्हणत…

| Updated on: Dec 06, 2022 | 4:39 PM

आजोबा शरद पवार यांनी भूमिका मांडताच नातू रोहित पवारही आक्रमक झाले आहेत, रोहित पवार यांनी ट्विट करत कर्नाटक सरकारला इशारा देत असतांना शिंदे-फडणवीस सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे.

आजोबाच्या भूमिकेनंतर नातू आमदार रोहित पवार आक्रमक, शिंदे सरकारवर निशाणा साधत यापुढं शांत बसणार नाही म्हणत...
Image Credit source: Google
Follow us on

अहमदनगर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अधिकच चिघळला आहे. कर्नाटक सरकारकडून मंत्र्यांनी कर्नाटक मध्ये येऊ नये, महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन अथवा माध्यमांशी बोलू नये असे फतवे काढल्याने वाटवरण चांगलेच तापले होते. त्यातच महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड कर्नाटक राज्यात सुरू झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणीवस सरकारवर निशाणा साधत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावला जावं लागेल, असा इशारा शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्रकार परिषदेत दिला आहे. ही पत्रकार परिषद पाड पडताच शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. ट्विट करत कर्नाटक सरकारला इशारा देत असतांना शिंदे-फडणवीस सरकारला चिमटेही काढले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटले आहे, कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत?

निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय.

संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणं हा कसला संवाद?राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळं महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय.

पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढं न झुकणारा महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही, असा उल्लेख करत कर्नाटक सरकारला गर्भित इशारा दिला आहे.

आजोबा शरद पवार यांनी भूमिका मांडताच नातू रोहित पवारही आक्रमक झाले आहेत, रोहित पवार यांनी ट्विट करत कर्नाटक सरकारला इशारा देत असतांना शिंदे-फडणवीस सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे.