
मुंबई महानगर पालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीने बहुमताची मॅजिक फिगर गाठली आहे.त्यामुळे गेल्या २५ वर्षानंतर मुंबई महानगर पालिकेवर भाजपाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मुंबईत भाजपाला ८८ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक मुंबई महानगर पालिकेत महायुती सत्ता येण्याची स्थापन होणार आहे.यावर मोठ्या विजयावर शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, मी मुबईकरांना आणि ठाणेकरांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. मुंबईकरांना मनापासून धन्यवाद देतो. आम्ही मुंबई महानगर पालिकेत मॅजिक फिगर बहुमताजवळ पोहचलो आहे. आमच्या मजोरिटीमुळे महापालिकेत महायुतीचा महापौर होईल. ठाणे, कल्याण, डोंबिवली, एमएमआरमध्ये महायुतीने मुसंडी मारली आहे.मुंबईत भाजपा आणि शिवसेना मिळून महापौर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले की विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे. काही लोकांनी भावनेच्या टच देण्याचा प्रयत्न केला. परंतू आम्ही गेल्या साडेतीन वर्षात केलेली कामे, रखडवलेली मेट्रो सुरु केली, स्टे दिलेला कारशेडचे कामे केली, २५ वर्षे सत्ता राबविली त्यांना जनतेने विरोध केला आहे. मुंबईकरांनी विकास कामाला कौल दिला आहे. आमचा विजय हा परफॉर्मन्स बेस आहे असेही त्यांनी सांगितले.
Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...
BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...
BMC Election Result 2026 : आकडे खाली-वर होत होते, आता मुंबईत स्थिती काय?
बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘उबाठा १६० जागा लढवून ६० जागांवर आघाडीवर आहेत. परंतू विकास हाच ब्रँड, डेव्हलपमेंट हाच ब्रँड हे लोकांनी सिद्ध केले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगभरातले लोक येथे येतात. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर झाले पाहिजे… जागतिक दर्जाचे शहर झाले पाहिजे. मुंबई ही जगाला हेवा वाटेल अशी व्हायला हवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ट्रीलिटन डॉलर इकॉनॉमी गोल आहे, त्यात मुंबईचा महत्वाचा रोल आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
जनतेला मुंबई आम्ही खड्डेमुक्त, प्रदुषण मुक्त, ट्रॅफीक मुक्त, भ्रष्टाचार मुक्त पाहिजे. आम्ही सगळे मुंबईचे रस्ते कॉक्रीटचे करण्याचे काम सुरु केले होते. मेपर्यंत बहुतांश काम पूर्ण होईल, एसटीपी प्लान आखल्याने समुद्रात सांडपाणी थेट जाणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना अपग्रेड करणार आहोत, मेट्रो – २, मेट्रो-३, बीकेसीत अंडरग्राऊंड रोड, वांद्रे वर्सोवा रोड तयार करत आहोत. फ्रीवे ठाणे साकेत गायमुख मार्गे फोर्टमध्ये जाणारा फ्रीवे बांधत आहोत असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.