स्कॉर्पिओचा टायर फुटला अन्…; अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Ahilyanagar Accident: अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक बसली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

स्कॉर्पिओचा टायर फुटला अन्...; अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
| Updated on: Oct 24, 2026 | 11:55 PM

जामखेड-नगर रोडवर निंबोडी गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. हॉटेल उत्सवसमोर एका स्कॉर्पिओ गाडीने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयूर शिर्के असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जामखेड-नगर रोडवरील निंबोडी गावाजवळ हॉटेल उत्सवसमोर हा अपघात झाला आहे. स्कॉर्पिओ गाडीने रस्त्यावरून जाणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात रोहिदास कडबने आणि बाप्पू पवार यांचा मृत्यू झाला. तर मयूर शिर्के गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading...

स्कॉर्पिओ गाडीचे टायर फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. अपघात घडल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघातातील वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. या अपघाताला नेमके कोणते कारण कारणीभूत ठरले, स्कॉर्पिओचे टायर फुटल्यामुळेच चालकाचे नियंत्रण सुटले होते का आणि अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग किती होता, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासह अपघाताच्या कारणांचा छडा लावण्याचे काम सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us