अहमदनगरमध्ये साकारतेय राज्यातले सर्वात मोठे आयसीयू सेंटर; गुगल इंडिया, इस्कॉनचा पुढाकार

| Updated on: Apr 16, 2022 | 10:11 AM

लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कित्येक वर्षांपासून काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा आधार मिळतो. येथे अगदी कमी दरात उपचार उपलब्ध आहेत. त्यात आता राज्यातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरची भर पडणार आहे.

अहमदनगरमध्ये साकारतेय राज्यातले सर्वात मोठे आयसीयू सेंटर; गुगल इंडिया, इस्कॉनचा पुढाकार
प्रवरा रुग्णालयातील आसीयू सेंटरच्या कामाचा श्रीगणेशा इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगदास प्रभू यांच्या हस्ते झाला.
Follow us on

अहदमनगरः राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी येथील प्रवरा रुग्णालयात (Hospital) आता राज्यातील सर्वात मोठे आयसीयू सेंटर (Icu center) साकारले जात आहे. या ठिकाणी अत्याधुनिक व्हेटिंलेटरसह शंभर खाटा आणि 365 आयसीयू बेड उपलब्ध राहणार आहेत. या सेंटरच्या उभारणीसाठी प्रख्यात अशा गुगल इंडिया आणि इस्कॉनने (Iskon) पुढाकार घेतलाय. त्यासाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या सेंटरचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगदास प्रभू यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील, गुगल इंडियाचे हेल्थ केअर विभागप्रमुख गुलजार आझाद, ट्रान्सट्रेडिया युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष उदित शेठ, गोवर्धन इकोव्हिलेजचे सोशल इनिशिएटिव्ह प्रमुख यचनित पुष्कर्णा,राज्यपालांचे विशेष कार्यकारी अधिकारी राकेश नैथानी, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे आदी उपस्थित होते.

विखेंचे कार्य कौतुकास्पद…

कार्यक्रमात गौरंगदास प्रभू म्हणाले की, भारत सुपर पॉवर देश होण्यासाठी प्रवरा मॉडेल एक आदर्श उदाहरण आहे. विखे कुटुंबीयांकडून ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी सुरू असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. प्रवरा परिवार शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोचवत असल्याने समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले. शांती, समृद्धी व सुखाची गुरुकिल्ली गीतेत आहे. आज जग मानसिक विकारांनी ग्रासलेले आहे. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हे टाळायचे असेल, तर गीतेचा आधार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अल्प दरात सेवा…

लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कित्येक वर्षांपासून काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा आधार मिळतो. येथे अगदी कमी दरात उपचार उपलब्ध आहेत. त्यात आता आयसीयू सेंटरची भर पडली आहे. त्यामुळे अल्प दरातील उपचारासोबतच रोजगाराची संधीही या भागातील लोकांना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्य सुविधेत मोलाची भर पडली जाणार आहे.

भारत सुपर पॉवर देश होण्यासाठी प्रवरा मॉडेल एक आदर्श उदाहरण आहे. विखे कुटुंबीयांकडून ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी सुरू असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.

– गौरंगदास प्रभू, इस्कॉन
इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!