बापाला घरी बसा असं म्हणणारा मुलगा जन्मालाच यायला नको- जितेंद्र आव्हाड

jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात टीका -प्रत्युत्तर पाहायला मिळत आहेत. आता अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर वयावरून निशाणा साधला होता. या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बापाला घरी बसा असं म्हणणारा मुलगा जन्मालाच यायला नको- जितेंद्र आव्हाड
| Updated on: Jan 07, 2024 | 8:08 PM

अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वयावरून निशाणा साधला होता. सरकारमधील कर्मचारी वयाच्या 58 व्या वर्ष निवृत्त होतात, पण 84 वय झालं तरी तुम्ही थांबेना, असं अजित पवार म्हणाल होते. अजित पवारांचा रोख हा पूर्णपणे शरद पवारांवरच होता. कल्याणमधील मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी टीका केली होती. अजित पवारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

बापाला जो पर्यंत चालता ‌येत तो पर्यंत चालू द्यायला हवं. बापाला घरी बसा अस म्हणाणारा मुलगा जन्मालाच यायला नको. ज्यांनी मोठं केलं त्यांनाच तुम्ही म्हणतात घरी बसा. बार हे घरातील ऊर्जास्त्रोत असतं, आई-बापाविना घरं रिकामं वाटायला लागतं. महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लागलीय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

वय झाल्यावर थांबायचंं ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. पण काहीजण हट्टीपण करतात, ऐकायला तयार नाहीत. सरकारमधील कर्मचारीसुद्धा 58 व्या वर्षी निवृत्त होता. काहीजण 65, 70 आणि 75 व्या वर्षी निवृत्त होतात पण 84 वय झालं तरी तुम्ही थांबेना. अरे काय चाललंय आम्ही आहोत ना काम करायला. कुठं चुकलो सांगा, आमच्यात तेवढी धमक आणि ताकद असून पाच सहावेळा उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.