दुष्काळी स्थितीत पाण्याची बॅलन्सशीट कशी ठेवायची, हिवरे बाजारने महाराष्ट्रासमोर घालून दिला आदर्श

Hivare Bazar Water Balance Sheet: अनेक जिल्ह्यांना अल निनोचा फटका बसला आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आदर्श ग्राम हिवरे बाजाराने पाणी वापराचा एक मोठा आदर्श घालून दिला आहे.

दुष्काळी स्थितीत पाण्याची बॅलन्सशीट कशी ठेवायची, हिवरे बाजारने महाराष्ट्रासमोर घालून दिला आदर्श
आदर्श गाव हिवरे बाजार
| Updated on: Sep 23, 2026 | 8:53 AM

कुणाल जायकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. राज्यभरात दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजाराने पाणी वापराचा अजून एक आदर्श घालून दिला आहे. हिवरे बाजार दरवर्षी पाण्याचा ताळेबंद (Water Budgeting) मांडते. 1995 पासून या गावाने हा रतीब पाळला आहे. राज्यभरात पाण्याची टंचाई असतानाही हिवरे बाजारात मात्र पाण्याची कसलीही कमतरता भासत नाही. त्यामागे हा पाण्याचा ताळेबंद आहे.

वर्षात तीनदा पाण्याचा ताळेबंद

हिवरे बाजारात दरवर्षी 1 मे, महाराष्ट्र दिन, 2 ऑक्टोबर, गांधी जयंती आणि नवरात्रीच्या सातव्या माळेला पाण्याचा अधिकृत ताळेबंद गावकऱ्यांसमोर मांडला जातो. गावात वर्षभरात एकूण किती पाऊस पडला. भूगर्भातील पाणी पातळी आणि पुढील वर्षी पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि गुराढोरांसाठी किती पाणी उपलब्ध राहील, याचा अचूक हिशोब या पाण्याच्या ताळेबंदातून मांडला जातो.

सरपंच पोपटराव पवार यांची माहिती

आदर्श ग्राम हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी गावाच्या पाणी ताळेबंदाविषयी मोठी माहिती दिली. त्यानुसार, गावात किती पाणी उपलब्ध आहे, त्यानुसारच पिकांची निवड आणि लागवड करण्यात येते. ज्यावर्षी गावात आणि परिसरात कमी पाऊस पडतो. त्यावेळी नगदी पिकं, अथवा अधिक पाणी लागणारी पिकं, ज्यात केळी, ऊस अथवा इतर पिकांवर बंदी घातली जाते. ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर बंधनकारक करण्यात येतो. यामुळे पाण्याची बचत होते. पिकांचं उत्पादन घेता येतं. तसेच भूगर्भातील पाणी साठा टिकून राहतो. 1995 पासून हा ताळेबंद आखला जात असल्याने राज्यात इतर ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तरी हिवरे बाजारामध्ये पाण्याची टंचाई जाणवत नाही.

चर्चेदरम्यान अधिकारी मोबाईलवर व्यस्त 

लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर चर्चा होत असताना अधिकारी मात्र मोबाईल मध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळाले. महत्वाच्या बैठकीत अधिकारी कर्मचाऱ्यांना मोबाईल सोबत बाळगू कसा दिला जातो हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us