Ashok Kharat: मोठी बातमी! भोंदू अशोक खरात प्रकरणात ED ची लवकरच एंट्री? रडारवर ते संशयास्पद कोट्यवधीचे व्यवहार, कुणा कुणाच्या गळ्याला फास?
Ashok Kharat ED Investigation: भल्याभल्यांच्या पाठीमागे लागलेल्या ईडीचा ससेमिरा आता भोंदू अशोक खरातच्या मागे लागण्याची दाट शक्यता आहे. खरात प्रकरणात ED ची लवकरच एंट्री होण्याची शक्यता आहे. ते संशयास्पद कोट्यवधीचे व्यवहार रडारवर आले आहेत. अनेकांचे पितळ यामुळे उघडे पडले आहे.

Ashok Kharat ED Investigation: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातचा पाय अजून खोलात गेला आहे. अनेकांना घाम फोडणारी आणि त्रस्त करणाऱ्या ईडीचा, सक्तवसुली संचालनालयाचा ससेमिरा आता खरातच्या मागे लागण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी अनेक संशयास्पद कोट्यवधीचे व्यवहार रडारवर आले आहेत. हे व्यवहार नेमके कुणाचे आहेत. या व्यवहारात कोण कोण आहेत, याची इत्यंभूत माहिती समोर येणार आहे. त्यामुळे अनेकांची धाबे दणाणली आहेत.
भोंदू अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होणार?
महिला अत्याचारानंतर खरात याचे कोट्यवधींचे व्यवहार रडारवर आली आहेत. नाशिक तसेच शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत 100 तर जगदंबा पतसंस्थेत 32 खाती सापडली आहेत. या 132 खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे शिर्डी पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. जगदंबा पतसंस्थेत इतर लोकांचे कागदपत्र वापरून खरात स्वत: 32 खाती ऑपरेट करत असल्याचे पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी कबुली दिली. तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांमध्येही मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता आहे. कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांमुळे अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
एका विशिष्ट तारखेलाच खाते का उघडले?
एका विशिष्ट तारखेला अशोक खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले का याकडे तपास यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. एका विशिष्ट तारखेलाच खरात खाते उघडत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याने यंत्रणा चक्रावल्या आहेत. ‘त्या’ तारखेमागील रहस्य काय ? पोलीस खात्यात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘त्या’ तारखेला खरातने खाते उघडले आहे का ? त्याबाबत सर्व माहिती पोलिसांनी काही पतसंस्थाकडून मागवली आहे. अनेक पतसंस्था आणि बँकांचे आर्थिक व्यवहार पोलीस यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. या पतसंस्था आणि बँकामध्ये खरातने कोणत्या तारखेला खाती उघडली. त्या तारखेला काय होते याचा तपास करण्यात येत आहे. तर आता कुणी कुणी त्याच्याशी व्यवहार केला आहे. त्यांची धाबे दणाणली आहेत. कारण याप्रकरणी त्यांची आर्थिक कुंडलीच यंत्रणांच्या हाती येणार आहे.