AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania: रिचार्जवाल्या ताई याची उत्तरं देतील का? अशोक खरातच्या CDR चा वाद, सूरज चव्हाणांनी प्रश्नांची सरबत्ती करत अंजली दमानियांना डिवचले

Suraj Chavan on Anjali Damania: दोन दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी खरात याचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) जाहीर केला. त्यात भोंदू खरातला कुणी फोन कॉल केले आणि त्याने कोणत्या नेत्याला कॉल केले हेच त्यांनी जाहीर केले. आता त्यांना हा सीडीआर कुणी दिला आणि तो कितपत खरा आहे , यावरून वाद पेटला आहे. दमानिया यांच्यावर टीका होत आहे.

Anjali Damania: रिचार्जवाल्या ताई याची उत्तरं देतील का? अशोक खरातच्या CDR चा वाद, सूरज चव्हाणांनी प्रश्नांची सरबत्ती करत अंजली दमानियांना डिवचले
सूरज चव्हाण यांची अंजली दमानिया यांच्यावर टीकाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 05, 2026 | 11:53 AM
Share

Suraj Chavan on Anjali Damania: दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात याचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) जाहीर केला. त्याने कुणाला फोन केले आणि खरातला कोणत्या नेत्याने फोन केले याची माहिती त्यांनी जाहीर केली. पण आता या सीडीआरच्या खरे पणावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दमानिया यांना हा सीडीआर कुणी दिला. त्याची सत्यता काय यावरून दमानिया यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे. या वादात आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवरून अंजली दमानिया यांना डिवचले आहे. त्यांच्या प्रश्नांनी आता वाद पेटला आहे.

रिचार्जवाल्या ताई याची उत्तरं देतील का?

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ट्वीट करत अंजली दमानिया यांना सीडीआरवरुन डिवचले आहे. त्यांनी याप्रकरणी आठ प्रश्न विचारले आहेत. त्यांनी सीडीआरच्या खरेपणावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तर दमानिया या कुणाचा राजकीय बळी घेत आहेत, असा मोठा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे.

1) CDR कुठून मिळाला यावर उत्तर देताना अंजली दमानिया यानी दोन उत्तर दिली आहेत.

2) आधी ओळखत नसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर पाठवली म्हणाल्या..

3) नंतर आपण म्हणालात AI च्या माध्यमातून मिळाली. खरंच? कुठलं AI अॅप लोकांचे कॉल डिटेल्स काढून देतं याबद्दल तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्यावी.

4) CDR च्या स्टेटमेंट बदल का केला ?

5) एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या माहितीवर तुम्ही इतका पटकन कसा विश्वास ठेवला? ती वेरीफाय केली का? आणि केली असेल तर कशी केली? त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागली?

6) उद्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोध राज्याच्या गृह विभागाने घेतला आणि ती माहिती खोटी निघाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का ?

7) तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती माहिती मा.मुख्यमंत्री आणि तेजस्वी सातपुतें यांना दिली.

8) राज्याचा गृह विभाग पोलीस महासंचालकांआधी किंवा गृहमंत्र्यांआधी तुम्हाला रिपोर्ट करतंय का ?

कुणाचा राजकीय बळी?

भोंदू बाबा खरात प्रकरणात रिचार्जवाल्या ताई भोंदू बाबा प्रकरणाववरून लक्ष विचलित करून कोणाचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न करत आहेत? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी विचारला. ताईचा CDR तपासून नेमका कोणी रिचार्ज केला याची माहिती मिळाली पाहिजे, अशी जहरी टीका सुद्धा सूरज चव्हाण यांनी केली आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल