AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Attack News: पाठीमागे मृत्यू अन् जीवाच्या आकांताने धावाधाव…. 26/11ची न ऐकलेली कहाणी

सर्वजण सुरक्षित जागा पकडायचा प्रयत्न करत होते. सगळ्यांना मोठ्या प्रमाणात भीती वाटत होती. दहशतीखाली वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक अज्ञात, अनोळखी व्यक्ती गणधारी वाटत होती. त्यावेळी त्या डब्यात अठरा प्रवासी होते. सोलापूर येथील महिला होत्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Mumbai Attack News: पाठीमागे मृत्यू अन् जीवाच्या आकांताने धावाधाव.... 26/11ची न ऐकलेली कहाणी
Mumbai 26|11 Attack News
| Updated on: Nov 26, 2026 | 3:36 PM
Share

सागर सुरवसे, प्रतिनिधी:  26 नोव्हेंबर 2008.. मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील काळरात्र… याचदिवशी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला.पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नरिमन हाऊस यांसह अनेक गर्दीच्या ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. आज या भ्याड हल्ल्याला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. हा हल्ला आपल्या डोळ्यांनी पाहिलेले करमाळयातील माजी नगरसेवक फारुक जमादार यांनी Tv 9 मराठीशी बोलताना या दिवशीच्या कठू आठवणी सांगितल्या.

फटाकड्यांसारखा आवाज आला अन्… 

यावेळी बोलताना फारूक जमादार म्हणाले की, “मंत्रालयातील कामा निमित्त माझे मित्र माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ,साबीर तांबोळी मुंबई येथे गेलो होतो. सर्व कामे आटोपून व्हीटी रेल्वे स्टेशन वर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आलो. दरम्यान त्यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ हे करमाळ्याला खाजगी वाहनाने गेले . यावेळी फारुक जमादार स्वतः व त्यांचे सहकारी साबीर तांबोळी हे दोघेच सी एस टी रेल्वे स्टेशन वर थांबले .सिध्देश्वर एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन असल्याने गाडी ला वेळ होता,”

“जवळपास तीन तास रेल्वे स्टेशन वर थांबावे लागले. या काळात स्टेशन वर प्रचंड गर्दी होती. सौदी अरेबिया येथे जाणारे हाज यात्रेकरूंना सोडण्यासाठी आलेले प्रवाश्याची संख्याही यावेळी मोठी होती. रात्री ९ :५० मिनिटांनी सिध्देश्वर एक्स्प्रेस पण प्लाॅटफाॅर्म क्रमांक १४ वर गाडी येत आहे असे अनाउन्समेंट झाले नंतर आम्ही प्लाॅटफाॅर्म क्रमांक १४ च्या दिशेने वाटचाल करत असताना साधारण ९:५८ वाजता एके छप्पन स्टेनगन मधुन गोळीबार सुरू झाला. फटाकड्याच्या आवाजासारखा आवाज माळ लावल्यासारखा सतत येत होता, असं फारूक जमादार म्हणाले.

प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे…! 

तसेच  “आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो ते ठिकाण आम्ही काही क्षणापुर्वीच सोडले होते तर आमच्या शेजारी बसलेले सोलापूरचे प्रवासी, हजला जाणारे व त्यांचे नातेवाईक या गोळीबारामध्ये सापडले. दुर्दैवाने ते यात मुत्युमुखी पडल्याचे कळले. आजही हा प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. ज्यावेळी गोळीबार सुरू झाला, त्यावेळी पळत पळत जाऊन रेल्वेच्या डब्यात बसलो. सर्वत्र गोंधळ उडाला होता सगळे लोक सैरावैरा पळत होते. सर्वजण सुरक्षित जागा पकडायचा प्रयत्न करत होते. सगळ्यांना मोठ्या प्रमाणात भीती वाटत होती. दहशतीखाली वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक अज्ञात, अनोळखी व्यक्ती गणधारी वाटत होती. त्यावेळी त्या डब्यात अठरा प्रवासी होते. सोलापूर येथील महिला होत्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?