AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर आग, उत्साही कार्यकर्त्यांमुळे…

ajit pawar jan sanman yatra: अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या राज्यात सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात जात आहे. यावेळी महायुती सरकारकडून करण्यात येणारी कामांची माहिती ते जाहीर सभांमधून जनतेला देत आहे.

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर आग, उत्साही कार्यकर्त्यांमुळे...
व्यासपीठावर फटक्यांमुळे आग लागली
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 21, 2024 | 1:20 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवार यांची ही यात्रा शनिवारी कोकणातील रायगडमध्ये आली. त्यावेळी उत्साही कार्यकर्त्यांमुळे गंभीर घटना घडली. अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरच फटाक्यांची आतषबाजी केली. त्यावेळी व्यासपीठावर आग लागली. कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर अजित पवार यांच्या स्वागतासाठी फटके लावले होते. त्यातून ही घटना आग लागली. या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैव चांगले होते, त्यात काहीच नुकसान झाले नाही.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या राज्यात सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात जात आहे. यावेळी महायुती सरकारकडून करण्यात येणारी कामांची माहिती ते जाहीर सभांमधून जनतेला देत आहे. अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा आता कोकणात आली आहे. त्याचवेळी रायगडमध्ये आग लागल्याची घटना घडली.

अजित पवार महिला मेळाव्याला उपस्थित राहणार

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज कोकणात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण येथे आहे. यावेळी श्रीवर्धन येथे एक महिला मेळावा पार पडणार आहे. त्यावेळी अजित पवार पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात हरिहरेश्वर मंदिरातून अभिषेक झाल्यावर सोमजादेवी मंदिरात ही अजित पवार दर्शनाला जाणार आहेत.

वाशिममध्ये वॉटर कुलरच्या एसीमुळे आग

वाशिम शहराच्या रिसोड नाका परिसरात असलेल्या एका देशी दारूच्या दुकानातील वॉटर कुलरच्या एसीमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किट होताच आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र, आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना घडली. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता