Ajit Pawr : आजही हुंदके आवरणं कठिण… अजितदादांना जाऊन एक महिना; बारामती आजही शोकसागरात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला असला तरी बारामतीकर अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अजितदादांच्या आठवणींनी आजही अनेकांचे डोळे पाणावतात. त्यांच्या आई आशाताई पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी अजितदादांचा घात झाल्याचा संशय व्यक्त करत, अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सत्य समोर येईल.

| Updated on: Feb 28, 2026 | 2:13 PM
1 / 5
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण होत आहे.  अजितदादा आपल्यात नाही, यावर एक महिना झाला तरी विश्वास बसत नाही. अजितदादा नाहीत यावर विश्वास ठेवायला बारामतीकर अजूनही तयार नाहीत. हीच परिस्थिती राज्यातील इतर भागातील आहे. त्यामुळेच आज अजितदादांच्या आठवणी जागवल्या जात आहेत.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण होत आहे. अजितदादा आपल्यात नाही, यावर एक महिना झाला तरी विश्वास बसत नाही. अजितदादा नाहीत यावर विश्वास ठेवायला बारामतीकर अजूनही तयार नाहीत. हीच परिस्थिती राज्यातील इतर भागातील आहे. त्यामुळेच आज अजितदादांच्या आठवणी जागवल्या जात आहेत.

2 / 5

अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीतील नागरिक अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. दादांशिवाय बारामती अशक्य असल्याचं बारामतीतील ग्रामस्थांना वाटतंय. अजितदादांना जाऊन एक महिना झाल्याने आज बारामतीत दुखवटा पाळला जातोय.

3 / 5

दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आजही बारामतीकरांच्या डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नाही. ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात दादांवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी बारामतीकर आणि महाराष्ट्रातील नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अजितदादांच्या आठवणी जागवताना बारामतीकरांचा कंठ दाटून येत आहे. त्यांना हुंदका फुटत आहे.

4 / 5

अजितदादा यांच्या आई आशाताई पवार यांनाही लेकाच्या जाण्याचा धक्का बसला आहे. माझ्या पोटचा गोळा गेला? असं आशाताई पवार म्हणत असल्याचं बारामतीकरांनी सांगितलं. तसेच अजितदादांचा घात झाल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अजितदादांच्या अपघाताचा एफआयआर नोंदवून घेतला पाहिजे, अशी मागणी बारामतीकर करत आहेत.

5 / 5

अजितदादांच्या निधनाला एक महिना झाल्याने त्यांचा लेक जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. जय पवार यांनी त्यांच्या लहानपणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अजितदादांच्या खांद्यावर लहानगा जय बसलेला दिसत आहे. त्यावर जय पवार यांनी मिस यू दादा, असं म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us