
Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. अपघातात अजित पवार यांच्यासोबत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर राज्याला मोठा धक्का बसला आहे. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते शेतात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी 8 वाजता मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाणून घ्या अजित पवार यांच्या कुटुंबात किती सदस्य होते आणि अजित पवार कोणाच्या अधिक जवळ होते… याबद्दल देखील जाणून घ्या…
अजित पवार यांच्या कुटुंबा चार सदस्य होते. अजित पवार यांच्या पत्नीचं नाव सुनेत्रा पवार असं आहे. तर त्यांना दोन मुलं आहे. पार्थ पवार आणि जय पवार… ते अनेकदा त्यांच्या कुटुंबासोबत विविध कार्यक्रमांमध्ये दिसले. पवारांच्या पत्नी अनेकदा त्यांच्यासोबत निवडणूक सभांमध्ये जात असत. अजित पवारांचा मोठा मुलगा पार्थ यानेही निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
अजित पवार यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या मोठ्या भावाचं नाव श्रीनिवास पवार असं आहे. दोन्ही भावांमध्ये खूप चांगले संबंध होते. त्यांच्या बहिणीचे नाव विजया पाटील आहे. त्यांचे काका शरद पवार आहेत, जे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती आहेत.
राजकारणातील अजित पवार यांचा प्रवास अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 मध्ये झालेला. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात अजित पवार यांचा झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे मुंबईतील प्रसिद्ध राजकमल स्टुडिओमध्ये काम करायचे. वडिलांच्या निधनानंतर अजित पवार यांना शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली.
अजित पवार यांनी 1982 मध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. या काळात त्यांचे काका शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची मोठी ओळख निर्माण केली होती. आता अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे.