
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. सकाळी 8 वाजून 10 मिनिटाला त्यांचे विमान मुंबई विमानतळाहून बारामतीकडे निघाले. मात्र, बारामती विमानाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमानातील एकही व्यक्ती या अपघातात वाचू शकली नाही. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले, यावर कोणालाही विश्वास बसला नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही वेळातच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार शपथ घेणार यावर बोलताना शरद पवार यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार शपथ घेत आहेत, याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही किंवा त्यांच्यासोबत माझी चर्चाही झाली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी ते आग्रही आहेत.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. यामध्येच आता अत्यंत मोठी अपडेट आलीये. अजित पवार अपघात प्रकरणी आज प्राथमिक अहवाल येणार आहे. अजित पवार अपघातप्रकरणी प्राथमिक अहवाल सायंकाळी 7 पर्यंत येणे अपेक्षित आहे. Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून Directorate General of Civil Aviation (DGCA) कडे अहवाल सुपूर्द होणार.
दोन दिवसांपूर्वी VSR कंपनीच्या विमानांवर प्रश्न; पाच विमानांना तात्पुरती बंदी घालण्यात आली. अपघाताच्या कारणांवरून मोठा खुलासा शक्य असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष या अहवालाकडे आहे. या प्राथमिक अहवालातून नक्की काय खुलासा होते याकडे राज्याच्या नव्हे तर देशाच्या नजरा आहेत.
रोहित पवार ज्या पद्धतीने सतत आरोप करत आहेत, त्यावरून प्रकरणाला वेगळे वळण लागले. विविध तपास यंत्रणा अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी करत आहेत. सुरूवातीला सांगितले गेले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाला. मात्र, काल सीआयडीकडून स्पष्ट करण्यात आले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे.