AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार तुमच्यासोबत का नाही? रोहित पवार यांचे मोठे अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाले, तो…

अजित पवार यांच्या जाण्याने राज्यावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. रोहित पवार या अपघातानंतर आक्रमक भूमिका घेत आहेत.

पार्थ पवार तुमच्यासोबत का नाही? रोहित पवार यांचे मोठे अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाले, तो...
Rohit Pawar and Parth Pawar
| Updated on: Feb 27, 2026 | 10:52 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. सकाळी 8.45 ला अपघात झाला. अपघाताच्या सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या विमान अपघातात गंभीर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांच्यासह विमानातील कोणीही वाचू शकले नाही. या विमान अपघाताची काही व्हिडीओ पुढे आली, ज्याने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर त्याचे अनेक स्फोट झाले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हेच नाही तर त्यांनी पक्षाची धुराही आपल्या हाती घेतली असून पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या. सुरूवातीला प्रफुल पटेल यांचे नाव चर्चेत होते आणि सुनेत्रा पवार यांनी पक्षाची संपूर्ण जबाबदारी आपल्याकडे घेतली.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सतत गंभीर आरोप केली जात असून अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहित पवार याबाबात आक्रमक भूमिका घेत आहेत. मुंबईमध्ये गुन्हा दाखल झाला नसल्याने काल बारामती पोलिस स्टेशनमध्ये रोहित पवार पोहोचले. मात्र, बारामती पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करून घेतला नाही. रोहित पवार आक्रमक भूमिका घेत असून त्यांनी अनेक संशय व्यक्त केली.

यादरम्यान काल बारामती पोलिस स्टेशनमध्ये रोहित पवार यांच्यासोबत युगेंद्र पवारही पोहोचले होते. रोहित पवारांचे वडिलही पोलिस ठाण्याबाहेर पोहोचले होते. यावेळी अजित पवार यांच्या कुटुंबातील कोणीही पोहोचले नव्हते. रोहित पवार यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की, पार्थ पवार तुमच्यासोबत नाहीत का? त्यांच्यावर काही दबाव आहे का?

यावर बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, पार्थ त्याच्या लेव्हलच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून लढत असेल… त्यामुळे तो लढत नाही असे आपण बोलू शकत नाहीत,असे रोहित पवार यांनी स्पष्ट म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी VSR कंपनीवर गंभीर आरोप केली.

Follow Us
मराठीचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढवणे काळाची गरज - सुनेत्रा पवार
मराठीचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढवणे काळाची गरज - सुनेत्रा पवार.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषेचा स्वाभिमान शिकवला - देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषेचा स्वाभिमान शिकवला - देवेंद्र फडणवीस.
कधी-कधी राजकीय नेतेही विनोदाचा भाग होतात! शिंदेंचा मिश्किल टोला
कधी-कधी राजकीय नेतेही विनोदाचा भाग होतात! शिंदेंचा मिश्किल टोला.
मराठी भाषा भवनाला विलंब का झाला याचा...; उदय सामंतांचं मोठं विधान
मराठी भाषा भवनाला विलंब का झाला याचा...; उदय सामंतांचं मोठं विधान.
समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त व्हा; राज ठाकरेंचं आवाहन
समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त व्हा; राज ठाकरेंचं आवाहन.
तिन्ही पक्ष एकत्र बसून राज्यसभेबाबत ठरवू; राऊतांनी स्पष्टच सांगितलं
तिन्ही पक्ष एकत्र बसून राज्यसभेबाबत ठरवू; राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
महाराष्ट्रावर हिंदी सक्ती करू नये! राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना पलटवार
महाराष्ट्रावर हिंदी सक्ती करू नये! राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना पलटवार.
त्रिभाषा सूत्राचा दबाव केंद्र सरकारकडून! संजय राऊतांची टीका
त्रिभाषा सूत्राचा दबाव केंद्र सरकारकडून! संजय राऊतांची टीका.
सुनेत्रा पवारांना न बोलू देताच परिषद आटोपली! राजकीय चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांना न बोलू देताच परिषद आटोपली! राजकीय चर्चांना उधाण.
हिंदी सक्तीवरुन ठाकरेंची फडणवीसांकडून पोलखोल!
हिंदी सक्तीवरुन ठाकरेंची फडणवीसांकडून पोलखोल!.