AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस FIR का नोंदवून घेत नाहीत? रोहित पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, अजित पवार यांचे विमान..

रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक आहेत. त्यांनी नुकताच आता गंभीर आरोप केली आहेत.

पोलिस FIR का नोंदवून घेत नाहीत? रोहित पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, अजित पवार यांचे विमान..
Rohit Pawar
| Updated on: Feb 26, 2026 | 12:52 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात 28 जानेवारी 2026 रोजी झाला. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाची अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुरूवातीला सांगितले की, अजित पवार गंभीर जखमी आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांच्या अपघातानंतर मोठा संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. आज ते बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले. मात्र, अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी काही आरोप केले. अजित दादांचा एफआयआर दाखल का होत नाही? जर आमचा एफआयआर बरोबर नसेल तर आमच्यावर कारवाई करा, असे आम्ही त्यांना म्हणालो. कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रोहित पवार म्हणाले की,  2 तास आम्ही पोलिसांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. अपघात झाल्यावर Accident रिपोर्ट झालाय. मात्र, त्यातील क्रिमिनल अँगल तपासला जात नाही. त्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला करुन जात नाही. CID किंवा इतर कोणीही तपास करू द्या पण FIR दाखल करा.

आम्ही त्यांना हे पुरावे दिल्यावर अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी 1 तासाचा वेळ मागितला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. एफआयआर दाखल होत नाही म्हणजे नक्कीच यामागे कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. VSR कंपनीच्या हलगर्जीपणा दिसत आहे.

मुंबईप्रमाणे बारामती पोलिसांवरही दबाव असल्याचे आम्हाला दिसून आले. यामागे कोणीतरी आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले. इथे लोक आले आहेत आणि वकीलही आले आहेत. अजित पवार इतक्या मोठ्या लोकांचे मित्र होते तर त्या मित्रांनी लक्ष घालायला हवे असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. कबुतरे चोरीला गेल्याचा एफआयआर झाला पण अजित पवारांची एफआयआर होत नाही तर यामागे काय आहे?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...