AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान अपघातानंतर अजित पवारांच्या चुलत भावाचा मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हणाले, चर्चा…

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातानंतर गंभीर आरोप केली जात आहेत. त्यामध्येच आज बारामती पोलिस स्टेशन बाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले आहेत.

विमान अपघातानंतर अजित पवारांच्या चुलत भावाचा मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हणाले, चर्चा...
Ajit Pawar and Rajendra Pawar
| Updated on: Feb 26, 2026 | 10:13 AM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाची अपघात झाला. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांच्या विमानाचा धावपट्टीच्या अगदी शेजारी अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता गंभीर आरोप केली जात आहेत. रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. आमदार रोहित पवार बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच बारामती पोलिस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार बारामती पोलीस स्टेशन बाहेर दाखल झाले. जो अपघात घडला त्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला गेला पाहिजे, ही लोकशाही आहे, त्यामध्ये एखाद्या घटनेचा संशय व्यक्त होत असेल तर त्यातील सत्य बाहेर आले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना राजेंद्र पवार यांनी म्हटले की, आम्ही बारामतीकर म्हणून आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी आहोत. अधिवेशनात याबाबत चर्चा होत नसेल तर आपण समजून घेतले पाहिजे नक्की काय आहे, असेही त्यांनी म्हटले. काल मुंबईमधील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार पोहोचले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. ज्यानंतर काही वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार रोहित पवार आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.  आमदार रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बारामतीकर पोलिस स्टेशन बाहेर उपस्थित आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. अजित दादा यांचा अपघात झाला की घातपात याबाबत चौकशी झालीच पाहिजे.

विमान कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे रोहित पवारांची मागणी योग्य आहे. आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ आम्ही इथे आलोय, असे लोक म्हणत आहेत. आमदार रोहित पवार यांच्यासोबतच युगेंद्र पवार देखील आता या लढाईमध्ये मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...