AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : राज ठाकरेंनी कोणते दोन दाखले दिले ? रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा काय ?

अजित पवारांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण होत असताना, तो घातपात असल्याचा संशय वाढला आहे. एफआयआर दाखल होत नसल्याने रोहित पवार संतप्त असून, त्यांनी आता राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी पोलिसांना एफआयआर घेणे नागरिकांचा हक्क असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले. या प्रकरणी पोलीस कारवाईतील दिरंगाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Rohit Pawar : राज ठाकरेंनी कोणते दोन दाखले दिले ? रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा काय ?
रोहित पवारImage Credit source: social media
| Updated on: Feb 27, 2026 | 1:02 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, त्या घटनेला उद्या 1 महीना होईल. 28 जानेवारी रोजी बारामतीला सभेसाठी जात असताना व्हीएसआर कंपनीचं विमान लँडिंगदरम्यान खली कोसळलं आणि स्फोट झाला. यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला की तो घातपात आहे असा संशय लोकांच्या मनात असून त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)  तर हा विषय लावू धरला आहे. याच मुद्यावरून ते सातत्याने पाठपुरावा करत असून मुंबई, दिल्लीतील पत्रकार परिषदा घेतल्या,खासगी गुप्तहेर संघटनांना दिलेला तपास,  अशा सर्व माध्यमांतून ते अजित पवारांच्या अपघातामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले होते मात्र त्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे रोहित पवार नाराज असून व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते दोन दिवासंपूर्वी मुंबईतील पोलिस स्टेशनमध्ये गेले. तेथे काही दाद मिळाली नाही, त्यानतंर ते काल बारामती पोलिस स्टेशमथध्ये सुमारे दोन तास होते. मात्र या प्रकरणात अद्यापही एफआयआर दाखल झालेली नसून त्यामुळे ते उद्विग्न झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ते विविध नेत्यांची भेट घेत असून आज सकाळी त्यांनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधनाता राज ठाकरे यांच्याशी काय बोलणं झालं , हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.य

राज ठाकरेंनी कोणते दोन दाखले दिले ?

राज ठकरे यांना भेटायचं आहे, त्यांची वेल हवी आहे, अशी विनंती मी काल अमित ठाकरेंकडे केली. त्यानंतर आज राज साहेबांची भेट घेतली, अजित दादांचा विमान अपघात याबद्दल बोललो. त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी माहिती मी घेऊन गेलो, ती सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर बोलत असताना ते म्हणाले की हा महत्वाचा विषय आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की पोलिसांनी दोन एफआयआर का नोंदवून घेतला नाही, असा सवाल राज ठाकेर यांनी विचारला, असं रोहित पवार म्हणाले.

त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले दिले. ज्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी एफआयआर घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे, असं राज ठाकेर यांनी सांगितलं.आणि दुसरा दाखला त्यांनी दिला, ते म्हणाले, काहीही झालं तरी पोलिसांना एफआयआर घ्यावाच लागतो, असंही त्यांनी सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले. या महाराष्ट्रात एका मोठ्या व्यक्तीचा नेत्याचा जर एफआयआरचं होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं रोहित पवार यांनी नमूद केलं.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या