Ajit Pawar : माईक घेतला, आज फडणवीसांनी एकनाथरावांकडे चिठ्ठी सरकवली! आता अजितदादा म्हणतात, मीडियाच्या नजरेतून काही सुटत नाही!

| Updated on: Jul 14, 2022 | 7:47 PM

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या समोरून फडणवीस आणि माईक घेतला त्यावरून ही अजित पवारांनी (Ajit Pawar) फडणवीस यांना आता जोरदार टोलेबाजी केली आहे.

Ajit Pawar : माईक घेतला, आज फडणवीसांनी एकनाथरावांकडे चिठ्ठी सरकवली! आता अजितदादा म्हणतात, मीडियाच्या नजरेतून काही सुटत नाही!
माईक घेतला, आज फडणवीसांनी एकनाथरावांकडे चिठ्ठी सरकवली! आता अजितदादा म्हणतात, मीडियाच्या नजरेतून काही सुटत नाही!
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या. मात्र या पत्रकार परिषदेत एक असा प्रकार घडला की ज्या प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि आता पुन्हा यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी देण्यात आल्याची घटना कॅमेऱ्याचा कैद झाले आणि त्यानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका सुरू आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या समोरून फडणवीस आणि माईक घेतला त्यावरून ही अजित पवारांनी (Ajit Pawar) फडणवीस यांना आता जोरदार टोलेबाजी केली आहे. मीडियाच्या कॅमेऱ्यातून काही सुटत नाही, असा सूचक इशाराच अजित पवारांनी भाजपला दिलाय.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार याबाबत बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले असं दृश्य तुम्ही अडीच वर्षात कधी असं बघितलं का? मुख्यमंत्री म्हणून ठाकरे साहेबांचा मान मोठाच आहे तो आहेच. कारण ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. उपमुख्यमंत्री म्हणून दोन नंबरला आम्ही काम करायचो. परंतू मी असा कधीही माईक खेचला नाही. पण सहज सांगता येतं की तुम्ही बोलताय त्याचं मी उत्तर देतो, मग त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीच तो माईक तिकडे दिला असता. मात्र स्वतः माईक खेचायचं काहीच कारण नव्हतं, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

आत्तापासून असं म्हटल्यावर…

तसेच तिथं काय झालं, नाव घेताना एकनाथराव शिंदे यांनी कोल्हापूरच्या बाबतीत धैर्यशील माने यांचं नाव घेतलं. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांचं नाव घेतलं. मात्र ही नावं घेतल्यावर भाजपला वाटलं असेल आपल्या धनंजय महाडिकांचं नाव काही घेतलं नाही. त्यामुळे तसं झालं असावं सरकार चालवत असताना इतकं पक्षाच्या संदर्भात करायचं नसतं. शिवसेना असेल किंवा भाजपा असेल, शिवसेना ब गट म्हणायचं की शिंदे घट? हे आता देवालाच माहिती, पण त्याच्यामुळे अशा गोष्टी करू नये, अलीकडे मीडियाचे कॅमेरे इतक्या बारकाईने नजर ठेवून असतात की त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही. त्यामुळे हे आत्ता तर सुरुवात आहे, सुरुवातीलाच अजून पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात न येता अशी ओढा ओढ असेल आणि अशी चिट्ट्या देणं सुरू झालं तर पुढे काय होणार आहे? हे महाराष्ट्राला सगळं पहावं लागेल, असे सूचक विधानही अजित पवारांनी केलं आहे.