Ajit Pawar: अजित पवारांचं पुन्हा वळसे पाटलांच्या गृह मंत्रालयावर प्रश्न चिन्हं, गृहमंत्रालयाला हे माहितच असायला हवं होतं!

| Updated on: Jun 23, 2022 | 7:59 PM

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला हवी होती. त्यांचंच तर ते काम आहे. त्यांनी माहिती द्यायला हवी होती. असं म्हणत अजित पवार यांनी गृह मंत्रालयावर प्रश्नांचा भडिमारच केला.

Ajit Pawar: अजित पवारांचं पुन्हा वळसे पाटलांच्या गृह मंत्रालयावर प्रश्न चिन्हं, गृहमंत्रालयाला हे माहितच असायला हवं होतं!
अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे आता शेवटच्या घटका मोजत आहे. शिवसेने नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकार मध्ये राहणार नाही अशी भूमिकाच घेत हे सरकार आता पडणार असल्याचेच जाहीर केलं. तर आता आणखीन दोन शिवसेनेच आमदार गुवाहाटीत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यावरून आता राजकारण रंगू लागले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे केले आरोप खोडून काढले. तर याचवेळी त्यांनी ही बंडखोरी होत असताना गृहमंत्रालयाला याची माहिती नव्हती असे म्हणत गृहमंत्रालयावर (Home Ministry) तोशोरे ओढले आहेत. तर यामधून दिलीप वळसे-पाटीलांच्या गृह मंत्रालयावर प्रश्न चिन्हं उभे केले आहेत.

गृह मंत्रालयावर प्रश्नांचा भडिमार

राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर जनतेसह महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही मित्र पक्ष चिंतेच्या गर्तेत गेले होते. कारण महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे गटनेतेच हे तब्बल 43 आमदार घेऊन पसार झाले होते. त्यांनी या बंडखोरीचे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटलं होते. त्याचदरम्यान या बंडात शिवसेनेचे दुसरे नेते आणि राज्यगृहमंत्री शंभूराज देसाई हे ही असल्याने आता गृह मंत्रालयावर प्रश्न चिन्हं उभे केले जात आहेत. तर जे काही घडत असेल त्यांची माहिती ही पोलिसांना कशी नसणार. आणि जर माहिती नव्हतीतर त्यांनी ती मिळवली का नाही? आणि जर काही माहिती होतीच तर ती गृहमंत्र्यालायला का दिली नाही? गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला हवी होती. त्यांचंच तर ते काम आहे. त्यांनी माहिती द्यायला हवी होती. असं म्हणत अजित पवार यांनी गृह मंत्रालयावर प्रश्नांचा भडिमारच केला. याच बरोबर त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडेही प्रश्नार्थक बोटं करत, त्यांची सेक्युरिटी काय करत होती असा सवाल केला. तर अधिकारी काय करत होती. हा विचार करण्याचा आणि त्यावर संशोधन करण्याचा विषय असल्याचे म्हटलं आहे.

आम्ही आघाडीला पाठिंबा दिला होता

त्याचबरोबर अजित पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले की, आमचा आम्ही पाठिंबा काढणार नाही. आम्ही आघाडीला पाठिंबा दिला होता. तर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार आहोत. नाना पटोले यांनी काय विधान करावं हा त्यांचा अधिकार असल्याचेही अजित पवार म्हणाले. तर कोण काय म्हणाले, याचा मला काय घेणं देणं नाही असेही अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये असल्याचा सांगताना आताच्या घडीलाही त्यांच्याबरोबर सत्तेतच आहोत असेही त्यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा