पुण्यात निर्बंध वाढणार का? दादा, मला वाचवाला अजित पवारांनी रोखठोक सांगितलं…

| Updated on: Jan 15, 2022 | 2:57 PM

पुण्यात काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांनी आंदोलन केलं होतं. पुण्यातली आणि राज्यातली वाढली रुग्णसंख्या लक्षात घेता निर्बंध आणखी कडक होणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज अजित पवारांना पुण्यातल्या निर्बंधांबाबत विचारले असता, अजित पवारांनी इशारा दिला आहे.

पुण्यात निर्बंध वाढणार का? दादा, मला वाचवाला अजित पवारांनी रोखठोक सांगितलं...
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

पुणे : राज्यात सध्या कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे, त्यामुळे सैल झालेले निर्बंध (Lockdown) पुन्हा कडक झाले आहेत. कोरोनाचे निर्बंध चालू असल्याने या काळात आंदोलन करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने रिक्षाचालक रिक्षावर दादा मला वाचवा असे स्टिकर्स लावून सरकारचा निषेध नोंदवत आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांनी आंदोलन केलं होतं. पुण्यातली आणि राज्यातली वाढली रुग्णसंख्या लक्षात घेता निर्बंध आणखी कडक होणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज अजित पवारांना (Ajit pawar) पुण्यातल्या निर्बंधांबाबत विचारले असता, अजित पवारांनी इशारा दिला आहे, जर राज्यात ऑक्सिजन बेडची मागणी वाढल्यास आणि 700 मेट्रीक टनच्या पुढे ऑक्सिजनची गरज भासू लागल्यास लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री कठोर निर्णय घेतली असे अजित पवारांनी ठणकावले आहे.

लोकांच्या जीवाशी खेळ नको

पुण्यातील बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य संघटनेनं ओला उबर दुचाकी वाहतूक सुरु केलीय त्याचा निषेध केला आहे. अजित पवारांनी निर्णय घेतल्यास 12 लाख रिक्षावाल्यांच्या हिताचा निर्णय होईल. अन्यथा अजित पवार यांनी सही न केल्यास 12 लाख रिक्षावाले आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय यांच्यावर अन्याय होईल, असं बघतोय रिक्षावाला संघटना महाराष्ट्र यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. राज्यातल्या कोणत्याही नागरिकाशी जीवाशी खेळ नको, त्यासाठीच हे निर्बंध घालण्यात आले आहेत. पण मिनी लॉकडाऊन लावूनही काही ठिकाणी निर्बंधाचे पालन होताना दिसत नाही, आपण सर्व सुरू ठेवून काही निर्बंधांसह कोरोनावर नियंत्रणाचा प्रयत्न मिळवतोय हेही लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले. नंतर गर्दी वाढेल म्हणून काही काही ठिकाणी मी माझे दहाचे कार्यक्रम सातला उरकले. त्यामुळे सर्वांनीच याचे भान ठेवले पाहिजे, असे म्हणत अजित पवारांनी कान टोचले.

आसाममध्ये अडकलेल्यांना परत आणणार

महाराष्ट्रातील लोक आसाममध्ये अडकले आहेत, याबाबत अजित पवारांनी माहिती दिली. ज्या लोकांना कोरोना नाही त्याना तात्काळ परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे अजित पवारांनी सांगितलं. आपल्या लोकांना कुठेही अडकू देणार नाही, त्यांना परत आणण्यासाठी सरकार बांधील आहे, असेही त्यांनी सांगितलं.

Bhujbal | अदानी-अंबानींकडे सबसिडी मिळणार नाही, भुजबळांची टोलेबाजी

Ajit Pawar | अन् अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, नेमकं काय घडलं?

पंतप्रधानांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी, राज्यात मोठी चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया