Bhujbal | अदानी-अंबानींकडे सबसिडी मिळणार नाही, भुजबळांची तुफान टोलेबाजी

भुजबळ पुढे म्हणाले की, सध्या महावितरणवर 50 ते 60 हजार कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज बुडाले की, नेहमीप्रमाणे आपले केंद्र सरकार वीज कंपनी देईल. मग त्यावेळी अदानी - अंबानींकडे तुम्हाला कोणतीही सबसिडी मिळणार नाही.

Bhujbal | अदानी-अंबानींकडे सबसिडी मिळणार नाही, भुजबळांची तुफान टोलेबाजी
Chhagan Bhujbal

येवलाः पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज नाशिक जिल्ह्यातील येवल्यात विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी तुफान टोलेबाजी केली. त्यातून केंद्रातील भाजप सरकारला चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही. आपण कर्ज बुडवलं की केंद्र सरकार वीज कंपनी देईल. मग अदानी-अंबानींकडून कोणतीही सबसिडी मिळणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. जाणून घेऊयात भुजबळांनी नेमकी कोणती टोलेबाजी केली ते.

भुजबळ म्हणाले…

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येवला येथे विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, वीजेसाठी म्हणून नाशिक जिल्ह्याकरिता 35 कोटी रुपये काढून ठेवले आहेत. त्यामुळे येथून पुढे आपल्याला छोट्या-मोठ्या कामासाठी कोणाकडे जाण्याची गरज भासणार नाही. आपले वीजमंत्री केंद्रासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात प्रश्न मांडणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महावितरणला वाचवा…

भुजबळ पुढे म्हणाले की, सध्या महावितरणवर 50 ते 60 हजार कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज बुडाले की, नेहमीप्रमाणे आपले केंद्र सरकार वीज कंपनी देईल. मग त्यावेळी अदानी – अंबानींकडे तुम्हाला कोणतीही सबसिडी मिळणार नाही. त्यामुळे ही वीज कंपनी वाचवणे आपले कर्तव्य आहे. ज्यामुळे कोणत्याही अदानी-अंबानींच्या ताब्यात ही कंपनी जाणार नाही. ती त्यांच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नियम पाळा, कोरोना टाळा

नाशिकमध्ये अतिशय झपाट्याने वाढणारे कोरोना रुग्ण पाहता प्रशासनाला धडकी भरली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत जिल्हाधिकारी सभागृहात कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील रामकुंड, पंचवटी भागात होणाऱ्या गर्दीला आळा घालण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या. सोबतच खुल्या पर्यटनावर बंदी घालण्याचे आदेश दिले. धार्मिक स्थळांबाबतही लवकर निर्णय घेऊ, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. येवल्यातील नागरिकांनीही कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

सध्या महावितरणवर 50 ते 60 हजार कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज बुडाले की, नेहमीप्रमाणे आपले केंद्र सरकार वीज कंपनी देईल. मग त्यावेळी अदानी – अंबानींकडे तुम्हाला कोणतीही सबसिडी मिळणार नाही.

– छगन भुजबळ, पालकमंत्री

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Published On - 2:51 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI