सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांची पावलं अलिबागकडे, किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

| Updated on: Dec 26, 2020 | 10:21 PM

त्यामुळे वनडे पिकनिकसाठी अलिबागला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. (Alibag Famous tourist Destination for Mumbaikar)

सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांची पावलं अलिबागकडे, किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
Follow us on

रायगड : कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे 6 ते 8 महिने अनेक नागरिक घरात अडकले होते. मात्र दोन महिन्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्या, नाताळ, विकेंड त्यासोबतच न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अनेकांनी पिकनिकचे प्लॅन आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वनडे पिकनिकसाठी अलिबागला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. (Alibag Famous tourist Destination for Mumbaikar)

परदेशात कोरोना विषाणूचा दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे मुबंई महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची सचांरबदीची घोषणा करण्यात आली. त्यापाठोपाठ नवी मुबंई, ठाणे जिल्ह्यातील अनेक क्षेत्रात विविध सचांरबंदी लागू करण्यात आली. यामुळे मुबंई क्षेत्रातील नागरिकांनी रायगडकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला.

त्यामुळे हमखास वन डे पिकनिकसाठी अलिबागला मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी पसंती दिली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रायगडकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर गर्दी पाहायला मिळाली. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे, मुंबई-पुणे जुना हायवे, मुंबई गोवा हायवे, मुंबई ते मांडवा बोट सर्व्हिसद्वारे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची वाहनांची गर्दी पाहायला मिळाली आहे.

बच्चे कपंनी, कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणी, तरुण मंडळी असे वेगवेगळ्या गटातील पर्यटक रायगडमध्ये येत आहेत. विशेषत: अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या डेस्टीनेशनकडे अनेकजण पर्यटनासाठी जात आहे.

अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन समुद्र किनारी असलेलं स्वच्छ पाणी, मोकळे आणि स्वच्छ बीच, मुबंईसह प्रदूषण गर्दीपासून जवळ असूनही प्रदूषणरहित कोकणाच्या निसर्गात पर्यटन बहरलेला पाहायला मिळत आहे.

अलिबाग समुद्र किनाऱ्यालगत 300 वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमाराची राजधानी असलेला ऐतहासिक कुलाबा किल्ला, अलिबागजवळ वर्सोली, अक्शी, किहीम, मुरुड, काशिंद बिचवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच रेवदंडा येथील बिर्ला मंदीर, मुबंई ते माडंवा रो रो बोट, फेरी बोट सेवा या सर्व बिच डेस्टीनेशनकरिता रायगडकडे पर्यटकांचा ओघ पाहायला मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व बीचवर हमखास वॉटरस्पोर्टसचा आनंद देणारी मोटारबाईक सफारी, बोटींग, घोडस्वारी, उंट सवारी, टाग्यांतून फेरफटका मारणं याचा आनंद घेताना दिसत आहे.(Alibag Famous tourist Destination for Mumbaikar)

संबंधित बातम्या : 

वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका, मनसेची मुख्यमंत्र्यांना विनंती

पुण्यात एका ‘मिशन’साठी आलो; चंद्रकांतदादांचा गौप्यस्फोट