
19 वर्षांपूर्वी 11 जुलै 2006 रोजची सायंकाळ मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी काळरात्र ठरली. लोकलच्या फर्स्टक्लासच्या डब्यात सात ब्लास्ट झाले. त्यात 189 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 824 जण जखमी झाले. सायंकाळी 6:23 p.m. ते 6:29 p.m दरम्यान कुकरमध्ये ठेवलेल्या आरडीएक्सचा ब्लास्ट करण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष सोडले. न्या.अनिल किलोर आणि एस.जी.चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.या निकालाने सरकारी पक्षास मोठा धक्का बसला आहे. या निकालाने निष्पाप 189 लोकांचे प्राण कोणी घेतले असा सवाल निर्माण झाला आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे की या केसमध्ये आपण फॉलो नव्हतो, परंतू कोर्टाचा निकाल आश्चर्यचकीत करणार आहे. त्यांनी हा गंभीर सवाल केला जर आरोपी ब्लास्टमध्ये सामील नव्हते तर कोण होता. तर महाराष्ट्र सरकारने हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...