लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावणाऱ्या ‘रमाबाईं’ना मोठा आधार; आता मिळणार इतके रुपये
मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावणाऱ्या रमाबाई रणवीर यांना मोठा आधार मिळाला आहे. नवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या महाराष्ट्रातील रमाबाई अशोक रणवीर यांच्या मदतीसाठी विजया रहाटकर यांनी पुढाकार घेतला आहे. विजया रहाटकर यांनी पुढाकार घेतला आहे.

‘इच्छा तेथे मार्ग…’, ही म्हणल प्रचलित आहे…. पण बीड येथील रमाबाई रणवीर यांनी हे सत्य करुन दाखवलं आहे. लेकीच्या शिक्षणासाठी रमाबाई रणवीर अनवाणी धावल्या आणि जिंकल्या. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका 47 वर्षीय महिलेने दृढनिश्चयाचे आणि मुलांच्या शिक्षणाप्रती असलेल्या आईच्या वचनबद्धतेचे एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहे. रमाबाई रणवीर यांनी साडी नेसून अनवाणी धावत मॅरेथॉन जिंकली आणि स्पोर्ट्स शूज व ट्रॅक सूट घालून स्पर्धा करणाऱ्या अनेक तरुण स्पर्धकांना मागे टाकले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोळेश्वर शैक्षणिक संकुलातर्फे आयोजित अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘अमृत दाऊद’ स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. ही शर्यत जिंकून त्यांना हजार रुपयांचं रोख बक्षीस मिळाले, जे त्या आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरणार आहेत.
सांगायचं झालं तर, आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी साडी नेसून आणि अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या महाराष्ट्रातील श्रीमती रमाबाई अशोक रणवीर यांच्या मदतीसाठी विजया रहाटकर यांनी पुढाकार घेतला आहे. विजया रहाटकर यांनी एक लाख रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
श्रीमती विजया रहाटकर यांनी रमाबाई यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, त्यांच्याशी संवाद साधला आणि या आर्थिक सहकार्याची माहिती दिली. सांगायचं झालं तर, रमाबाई यांच्याकडे टॅकसूट नव्हता आणि स्पोर्ट्स शूज देखील नव्हते. पण मुलीच्या शिक्षणासाठी त्यांची इच्छाशक्ती दृढ होती. अखेर त्या धावल्या आणि 3 हजार रुपये जिंकल्या. या रकमेचा उपयोग त्या मुलीच्या फिसाठी करणार आहेत. आता विजया रहाटकर यांनी एक लाख रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
शर्यत जिंकल्यानंतर रमाबाई म्हणाल्या, ‘शर्यतीत मला माझ्या मुलींचं भविष्य दिसत होतं. पायाला खडे टोचत होते, पण मी जिद्द हरली नाही. कारण मला पुरस्काराची किंमत जिंकायचीच होती. या जिंकलेल्या पैशातून मला मुलींसाठी वही, पेन खरेदी करणार आहे. ज्यामुळे तिच्या शिक्षणात कोणती अडचण येणार नाही.’, सध्याा सर्वत्र रणाबाई रणवीर यांचं कौतुक होत आहे.