अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी गुप्त सवांद; पत्रकार, पोलिसांना कार्यक्रमातून बाहेर काढले

या सवांद कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्या पासून, वसई तालुक्यात झेंडे, बॅनर, सोशल मीडियावर पब्लिसिटी करून, पत्रकारांना स्वतंत्र निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे सर्वच इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियाचे पत्रकार वृत्तसंकलन साठी हजर होते. 3 चा कार्यक्रम असताना पाऊण तास अमित ठाकरे उशिरा कार्यक्रमात दाखल झाले. त्यांचा सभागृहात प्रवेश होताच, पत्रकार, मनसे पदाधिकारी, पोलीस, गोपनीय पोलीस यांना सर्वानाच बाहेर काढण्यात आले. जर अमित ठाकरे यांना विध्यार्थी यांच्याशी एवढा गोपनीय सवांद साधायचा होता तर एवढा गाजावाजा करत महासंपर्क संवाद दौरा काढलाच कशाला असा तीव्र प्रतिक्रिया ही व्यक्त होत आहेत.

अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी गुप्त सवांद; पत्रकार, पोलिसांना कार्यक्रमातून बाहेर काढले
| Updated on: Jul 19, 2022 | 8:20 PM

वसई : महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे(Amit Thackeray ) यांनी आज वसई दौरा केला. यावेळी त्यांनी वसईतील विध्यार्थ्यांशी गोपनीय संवाद साधला. अमित ठाकरे यांची सवांद कार्यक्रमात इन्ट्री होताच वृत्त संकलन करण्यासाठी दोन तासापासून सभागृहात बसलेल्या पत्रकारांना बाहेर काढण्यात आले. जर, पत्रकारांना कार्यक्रमात प्रवेश नव्हता तर मनसे पदाधिकारी यांनी पत्रकारांना का निमंत्रित केले होते असा सवाल उपस्थित करून, सर्व पत्रकारांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ पत्रकारच नाही तर पोलिसांना कार्यक्रमातून बाहेर काढले गेले.

अमित ठाकरे यांची विध्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विध्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांनी विध्यार्थी पुनर्बांधणीसाठी महासंपर्क दौरा सुरू केला आहे. आज वसई दौरा करून त्यांनी नालासोपारा पूर्व रेंजन्सी सभागृहात विध्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

या सवांद कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्या पासून, वसई तालुक्यात झेंडे, बॅनर, सोशल मीडियावर पब्लिसिटी करून, पत्रकारांना स्वतंत्र निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे सर्वच इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियाचे पत्रकार वृत्तसंकलन साठी हजर होते. 3 चा कार्यक्रम असताना पाऊण तास अमित ठाकरे उशिरा कार्यक्रमात दाखल झाले. त्यांचा सभागृहात प्रवेश होताच, पत्रकार, मनसे पदाधिकारी, पोलीस, गोपनीय पोलीस यांना सर्वानाच बाहेर काढण्यात आले. जर अमित ठाकरे यांना विध्यार्थी यांच्याशी एवढा गोपनीय सवांद साधायचा होता तर एवढा गाजावाजा करत महासंपर्क संवाद दौरा काढलाच कशाला असा तीव्र प्रतिक्रिया ही व्यक्त होत आहेत.

नालासोपारा रेंजन्सी हॉल मध्ये 3 वाजता विध्यार्थी सवांद कार्यक्रम होता. महामार्गावरील सुवी पॅलेस या हॉटेल मध्ये 2 वाजून 22 मिनिटाला अमित ठाकरे यांची इन्ट्री झाली. त्याठिकाणी पदाधिकारी सोबत जेवले, आणि 3.45 ला ते सवांद कार्यक्रमात पोहचले. नेता उशिरा आला तरी पत्रकार वृत्तसंकलन करण्यासाठी थांबले. पण नेत्यांची इन्ट्री होताच पत्रकारांनाच बाहेर काढल्याने नेत्यांची मुजोरगिरी आणि पत्रकारांची गळचेपी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.