अमरावतीत महाविकास आघाडीला अंतर्गत गटबाजीचा फटका; काँग्रेसला एक चूक नडली, मविआचं गणित कुठं फिस्कटलं?

अमरावतीत महाविकास आघाडीला अंतर्गत गटबाजीचा फटका बसताना दिसत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीला एक चूक नडली. त्यामुळे महाविकास आघाडीचं गणित फिस्कटल्याचे दिसून आलं.

अमरावतीत महाविकास आघाडीला अंतर्गत गटबाजीचा फटका; काँग्रेसला एक चूक नडली, मविआचं गणित कुठं फिस्कटलं?
amravati news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 28, 2026 | 9:05 AM

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमरावतीत बंडखोरी आणि मत विभाजनाचा फटका मतमोजणीत ठळकपणे दिसून आला. या शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. तर या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये शिंदेंच्या उमेदवाराने मुसंडी मारली आहे.  अमरावतीत महाविकास आघाडीचं गणित कुठं बिघडलं, जाणून घ्या.

सध्या आघाडीवर कोण?

Loading...

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ मागील 24 तासांपासून मतमोजणी सुरू आहे.  मतमोजणीत 17 व्या बाद फेरीअंती शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किरण सरनाईक हे 3650 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखर उमेदवार श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  17 व्या बाद फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8575 मते मिळाली आहेत.  शिवसेनेचे बंडखोर 4921 श्रीकांत देशपांडे यांना मते मिळाली आहेत.  तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4925 मते मिळाली आहेत. विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा आवश्यक आहे.  विजयासाठी किरण सरनाईक यांना 7569 मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे.

गणित कुठं बिघडलं?

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीमधील अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना मोठा फटका बसला. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय लहाने निवडणुकीत असल्याने महाविकास आघाडीमध्ये मतांचं मोठं विभाजन झाल्याचे दिसून आलं. तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने किरण सरनाईक यांनाही फटका बसला. मात्र तरीही किरण सरनाईक हे आघाडीवर आहेत.

15 व्या फेरीत काय घडलं?

तत्पूर्वी, या मतदारसंघात 15 व्या फेरीनंतर 26 पैकी 15 उमेदवार आता बाद झाले. 15 व्या फेरीअंती शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8269 मते मिळाली होती.  तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे या 4752 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होत्या. तर  शिंदेगटाचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 4732 मते मिळाली.

17व्या बाद फेरीनंतर उमेदवारांची मते

किरण सरनाईक (महायुती) – 8575

अदिती पोहरे (काँग्रेस) – 4925

श्रीकांत देशपांडे (शिवसेना बंडखोर) – 4921

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us