Bacchu Kadu: मतं मिळवण्यासाठी प्रत्येकाला ‘प्रसाद’…बच्चू कडू यांचं वक्तव्य , शिक्षक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील Video व्हायरल

Bacchu Kadu on Amravati Teachers Constituency: अमरावतीमधील एका हॉटेलमध्ये बंद दाराआड बैठकीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात शिंदे सेनेचे शिलेदार आणि आमदार बच्चू कडू यांचे वक्तव्य व्हायरल झाले आहे.

Bacchu Kadu: मतं मिळवण्यासाठी प्रत्येकाला प्रसाद...बच्चू कडू यांचं वक्तव्य , शिक्षक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील Video व्हायरल
बच्चू कडू यांच्या अमरावतीमधील विधानाची जोरदार चर्चा
| Updated on: Oct 15, 2026 | 6:27 AM

स्वप्नील उमप, प्रतिनिधी, टीव्ही 9, मराठी : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी , अमरावतीत शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या रणनीतीवर बोलताना अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मतांची जुळवाजुळव आणि ‘प्रसादा’बाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ आता समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

अमरावतीमधील एका हॉटेलमध्ये शिंदे गटाची एक बैठक पार पडली, ज्यामध्ये आमदार बच्चू कडू आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते, बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीवर भाष्य केले. या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या विजयासाठी आणि मतांची जुळवाजुळव करण्यासाठी केलेल्या विधानांमुळे मोठी चर्चा रंगली आहे.

Loading...

मतं आणि प्रसाद वाटप

बैठकीत बोलताना बच्चू कडू यांनी, आपली फळी कोणासोबत आहे हे निश्चित केल्यानंतर, मुस्लिम गटांमधील मते आपल्याकडे कशी वळवता येतील यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. एकाचे मते वळवल्यास कसा फायदा होऊ शकतो यावरही त्यांनी भर दिला. तालुकानिहाय यंत्रणा आणि ‘प्रसाद’: प्रत्येक तालुक्यात आपली माणसे कामाला लागली असून, सर्वांपर्यंत ‘प्रसाद’ पोहोचला आहे, असे बच्चू कडू यांनी भाषणादरम्यान नमूद केले.

हे भाषण सुरू असताना कोणीतरी रेकॉर्डिंग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर, बच्चू कडू यांनी संबंधित व्यक्तीला रेकॉर्डिंग करण्यापासून रोखले आणि त्यांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, या वक्तव्यावरून मतांच्या राजकारणाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अमरावती मतदारसंघात चुरस

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात यंदा मोठी चुरस आहे. ही जागा भाजपने शिंदे शिवसेनेसाठी सोडली. विद्यमान आमदार किरण सरनाईक हे महायुतीचे उमेदवार असले तरी माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी बंडखोरी जाहीर केली. त्यापाठोपाठ संगीता शिंदे, शेखर भोयर, डॉ. सुमित पवार यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

तर महाविकास आघाडीतही बंडाळी दिसून आली. ठाकरे सेनेने प्रा. डी. एस. लहाने यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने प्रा. आदिती पोहरे यांना तिकीट दिले. सोबतच विज्युक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला बसतो याचीच अधिक चर्चा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us