Ravi Rana on Hanuman Chalisa | शिवसेना आता काँग्रेस सेना झालीय, अमरावतीत आमदार रवी राणा यांची टीका

| Updated on: Apr 16, 2022 | 12:25 PM

चोरासारखं रात्री येणे दारू पिणे आणि नारे देणे. बाळासाहेब असताना ही शिवसेना होती. आता ही काँग्रेससेना झालीय. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिका केला नाही. हनुमान चालीसाच्या नावानं अपमान केला आहे, असा टोला आमदार रवी राणा यांनी लगावला.

Ravi Rana on Hanuman Chalisa | शिवसेना आता काँग्रेस सेना झालीय, अमरावतीत आमदार रवी राणा यांची टीका
अमरावतीत माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा
Image Credit source: tv 9
Follow us on

अमरावती : हनुमान जयंती निमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणांचे हनुमान चालीसा पठणाला सुरवात झाली. अमरावती शहरातील अकोली परिसरातील वीर हनुमानजी पगडीवाले बाबा मंदिरात पठण सुरू आहे. एकूण 40 वेळा होणार हनुमान चालीसाचे पठण होणार आहे. रवी राणा (Ravi Rana) यांच्या आव्हानानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत. मातोश्रीच्या बाहेर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात घोषणाबाजी होतेय. शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर जमलेत. त्याठिकाणी घोषणाबाजी करत आहेत. तर दुसरीकडं रवी राणा व नवनीत राणा या हनुमानाची पूजा करतात. अमरावतीमधील हनुमानाच्या मंदिरातमध्ये हनुमान चालीसेचं पठण राणा दाम्पत्य करत आहेत. पवनसुत हनुमान की जय, जय श्रीरामच्या घोषणा राणा दाम्पत्य हनुमान भक्तांसोबत देत आहेत. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणानंतर तिथं आरती झाली. चोरासारखं रात्री येणे दारू पिणे आणि नारे देणे. बाळासाहेब असताना ही शिवसेना होती. आता ही काँग्रेससेना झालीय. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिका केला नाही. हनुमान चालीसाच्या नावानं अपमान केला आहे, असा टोला आमदार रवी राणा यांनी लगावला.

शहरात पोलिसांची कुमक वाढविली

राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत. युवा सेनेचे अमरावतीत कार्यकर्ते काल रात्री रवी राणा यांच्या घरासमोर धडकले. या कार्यकर्त्यांनी सकाळी हनुमान चालीसा म्हणण्यासाठी यायला हवे होते, असा टोला रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावला. युवा सेना आणि युवा स्वाभिमानीचे कार्यकर्ते यांच्यात समन्यव ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कुमक वाढविली आहे. पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.

असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना असंतोष निर्माण करायचा आहे, असा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी लावला. ठाकूर म्हणाल्या, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. हनुमान जयंती हा उत्सव आहे. तो आम्ही साजरा करत आहोत. पण, काही लोक असं दाखवत आहे की हिंदु धर्मावर त्यांचीच मक्तेदारी आहे. मात्र, कोणीही स्वतःची मक्तेदारी समजू नये. काही जण असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला.

Ravi Rana on Hanuman Chalisa | हनुमान मंदिरांना भोंग्याचे मोफत वाटप, अमरावतीत आमदार रवी राणा यांची घोषणा, आज नेमकं काय होणार?

Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठवायचंय, कोल्हापूर उत्तरच्या निकालावर नाना पटोलेंनी दादांना डिवचलं

Washim | बंजारा समाज ठाकरे सरकारवर नाराज, 23 एप्रिलला बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार, मूक आंदोलन करणार