Video – Amravati Fire | भंगाराच्या गोदामाला भीषण आग! चांदुरबाजारच्या रहिवासी भागात धुळीचे लोट

अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथे भीषण आग लागली. या आगीत भंगार विक्रेत्याचे सर्व साहित्य जळून खाक झाले. ही आग लागली असताना धुळीचे लोट हवेत उडताना दिसत होते.

Video - Amravati Fire | भंगाराच्या गोदामाला भीषण आग! चांदुरबाजारच्या रहिवासी भागात धुळीचे लोट
चांदुरबाजार येथे भंगाराला लागलेली भीषण आग.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 10:44 AM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार ते परतवाडा मार्गावर (Chandurbazar to Paratwada Road) असलेल्या फ्रेंच कॉलनीमधील लोकवस्तीत ( Population in French Colony) आग लागली. यात एका मोठ्या भंगारच्या गोडाऊनचे नुकसान झाले. भर लोकवस्तीमधील गोडाऊनला आग लागली. त्यामुळं भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची घटना समोर येताच चांदुरबाजार नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला (Municipal Fire Brigade) पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली आहे. या आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

अशी घडली घटना

चांदुरबाजारच्या फ्रेंच कॉलनीत भंगाराची दुकान आहे. ही दुकान भर वस्तीत आहे. या ठिकाणी खरेदी करून आणलेले भंगार ठेवले जाते. आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. पण, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते.

पाहा व्हिडीओ

साहित्य जळून खाक

भंगाराचे साहित्य असल्याने ही आग जोराने पसरली. त्यामुळं सर्व भंगाराचे साहित्य जळून खाक झाले. आगीनंतर धुळाचे लोट आकाशात वाहताना दिसत होते. ही आग पाहण्यासाठी लोकांनी बरीच गर्दी केली होती. पण, आग मोठी असल्यानं त्वरित विझविता आली नाही. त्यामुळं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत भंगाराचे साहित्य जळून खाक झाले होते.

नागपुरात 4 अर्भकं सापडल्याने खळबळ, मोकळ्या मैदानात अर्भकं आली कुठून?

रा कापत होता तरुण, वाघाने हल्ला करून फरफटत नेले… वाचवा, वाचवा ओरडण्याचा आवाज!

धक्कादायक! गोंदियात सांभाळायला दिले तिनेच केली मुलाची विक्री, आई पाहायला गेली तेव्हा फुटले बिंग