AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! गोंदियात सांभाळायला दिले तिनेच केली मुलाची विक्री, आई पाहायला गेली तेव्हा फुटले बिंग

सहा वर्षाच्या मुलाची 1 लाख 20 हजार रुपयांत विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले. आईने दुसरे लग्न केले म्हणून सांभाळ करण्यासाठी मुलाला दिले होते. आई आपल्या मुलाला पाहायला आली आणि प्रकरणाचे बिंग फुटले. मुलाची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! गोंदियात सांभाळायला दिले तिनेच केली मुलाची विक्री, आई पाहायला गेली तेव्हा फुटले बिंग
गोंदियात सांभाळायला दिलेला मुलगा विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 3:43 PM
Share

गोंदिया : देशात मूल चोरी आणि विक्री करण्याच्या घटना आपण नेहमीच पाहतो. मात्र सांभाळ करण्यासाठी दिलेल्या मुलाला चक्क विक्री करण्याची घटना गोंदिया येथे घडली. पहिल्या पतीपासून झालेला मुलगा दुसऱ्या महिलेला सांभाळ करण्यासाठी दिला. स्वत: दुसरे लग्न करणारी आई दोन वर्षांनंतर आपल्या मुलाची विचारपूस करण्यास गेली. परंतु ज्या महिलेकडे आपला मुलगा दिला. तिच्याजवळ आपला मुलगाच नाही, अशी खात्री पटताच आईने गोंदिया शहर पोलिसात ( Gondia city police) धाव घेतली. गोंदिया पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असता त्या सहा वर्षांच्या मुलाची एक लाख वीस हजार रुपयात भंडारा जिल्ह्यात विक्री (sale in Bhandara district) केल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक (five arrested) करण्यात आली आहे.

मुलगा न दिसल्याने आला संशय

गोंदियातील एका महिलेला पहिल्या पतीपासून असलेला चिकू (बदललेले नाव) याला 2020 मध्ये गोंदियातील मंगला उर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे हिच्याकडे सांभाळायला दिले होते. मंगला चंद्रिकापुरे हिने त्या महिलाचे लग्न जळगावच्या चारडी येथील एका इसमाशी लावून दिले. तुझ्या मुलाचे मी संगोपन करेन, असे तिने महिलेला म्हटले होते. मंगलावर विश्वास ठेवून महिलेने दुसरे लग्न केले. मात्र जेव्हा ती मुलाच्या भेटीसाठी 22 फेब्रुवारी 2022 रोजी गोंदियात आली असता आरोपी मंगलाकडे तिचा मुलगा नव्हता. तिने मुलासंदर्भात विचारपूस केली. त्यावेळी तिने उत्तर दिले नाही. माझ्या मुलाचे अपरहण झाले असावे किंवा त्याची विक्री झाली असावी, असा संशय घेतला.

पाच आरोपींना अटक

आईने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली. गोंदिया पोलिसांनी 1 मार्च रोजी या संदर्भात भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला होता. चौकशी केली असता तो मुलगा भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तेथे जावून काजोल छोटेलाल भुरे आणि त्यांची पत्नी अनिता भुरे यांच्याकडे आढळून आला. त्यांनी त्या मुलाला सुखदेव डोये आणि अनिता हटवार यांच्यामार्फत खरेदी केले असल्याचे सांगितले. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून आरोपी सापडण्याची शक्यता आहे. गोंदिया पोलीस पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली.

Photo – अकोल्याच्या सातपुडा पर्वतरांगेत वाघोबाचे दर्शन! अमरावतीचे पर्यटक झाले प्रसन्न

गोंदियात बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, सारखेच मजूर एकाचवेळी दोन ठिकाणी कामावर कसे?

क्रीडा विज्ञान, व्यवस्थापनात पदवी अभ्यासक्रम! विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता, क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.