AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंदियात बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, सारखेच मजूर एकाचवेळी दोन ठिकाणी कामावर कसे?

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. आता प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.

गोंदियात बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, सारखेच मजूर एकाचवेळी दोन ठिकाणी कामावर कसे?
गोरेगावातील बबई ग्रामपंचायतीसमोर तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेले झनक बिसेन.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 1:43 PM
Share

गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील बबई येथे (Babai in Goregaon taluka) ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराविरुद्ध येथील दोन नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बबई येथे दोन मोबाईलचे टॉवर (Mobile Tower) लावण्यात आले. मात्र या दोन टॉवर पैकी एका टॉवर कंपनीकडून आतापर्यंत कोणतीही वसुली करण्यात आली नाही. तर एका मोबाईल टॉवरला नाहरकत प्रमाणपत्र नाकारूनही गावात मोबाईल टॉवर लावण्यात आले आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच रोजगार हमीच्या दोन कामावर 12 मजूर दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी हजेरी पटावर दाखविण्यात आले आहेत. विविध कामांत झालेल्या भ्रष्टाचार उघड करूनही आतापर्यंत चौकशी करण्यात आली नाही. दोषींवर कारवाई कण्यात यावी, या मागणीसाठी झनक बिसेन (Jhanak Bisen) आणि भिवराम बिसेन हे दोघे उपोषणावर बसले आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. आता प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.

तक्रारीची दखल का नाही

चौदाव्या वित्त आयोगाच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. त्याची चौकशी करण्यात यावी, यासाठी उपोषण करत असल्याचं उपोषणकर्त्यांच म्हणण आहे. अनुप कटरे या व्यक्तीचे दुकान गोरेवात नाही. पण, अनुप कटरे या नावाने दुकान दाखवून खोटी बिलं उचलण्यात आली आहेत, अशीही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. कागदपत्र नसताना टॉवर उभा केला, असा प्रश्न आहे. कागदपत्र दिले नसल्याने टॉवर उभारण्याची परवानगी दिली नसल्याचं बबईच्या ग्रामसेवक एस. बी. लिल्हारे यांनी सांगितलं.

क्रीडा विज्ञान, व्यवस्थापनात पदवी अभ्यासक्रम! विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता, क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या, 36 व्या वर्षी टोकाचं पाऊल

यवतमाळातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, मायलेकीचा होरपळून मृत्यू!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.