मंत्र्याची बायको जास्त ट्रोल होते, त्याची उपाधी मला.. अमृता फडणवीस यांचे थेट विधान, म्हणाल्या..

अमृता फडणवीस त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. सोशल मीडियावरही त्या सक्रिय असतात. त्यांनी नुकताच आता मोठा खुलासा केला. मंत्र्याच्या बायकांवरील ट्रोलिंगवर बोलताना त्या दिसल्या आहेत.

मंत्र्याची बायको जास्त ट्रोल होते, त्याची उपाधी मला.. अमृता फडणवीस यांचे थेट विधान, म्हणाल्या..
Amruta Fadnavis
| Updated on: Sep 10, 2026 | 11:03 AM

नवरात्र उत्सव काळात गरब्यात मुस्लिमांच्या एन्ट्रीला बंदी घालावी, अशी मागणी थेट विश्व हिंदू परिषदेने केली. त्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी थेट मुस्लिमांना गरब्यात प्रवेश नकोच अशी भूमिका घेतली. त्यावर जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. प्रत्येकजण आपले मत मांडताना दिसत आहे. भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने गरब्यात मुस्लिमांना बंदी हवी, असे भाष्य केले जात असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर थेट भाष्य केले. गरब्यात मुस्लिमांना बंदी करू नये. गरबा हा सर्वसमावेश सण आहे. त्यात सर्वांना सहभाग मिळाला पाहिजे, असे स्पष्ट परखड मत अमृता फडणवीस यांनी मांडले. यासोबतच सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर अमृता फडणवीस यांनी थेट भाष्य केले. स्पष्ट बोलताना अमृता फडणवीस दिसल्या.

अमृता फडणवीस यांनी म्हटले की, मंत्र्‍याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते. त्याची उपाधी ही मला दिली गेली आहे. सततच्या होणाऱ्या ट्रोलवर त्यांनी भाष्य केले. अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. त्यांचे कोणतेही गाणे आले तरीही ट्रोलिंगचा सामना करावा लागलो. त्यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नितेश राणे भाजपाचे मंत्री आहेत, आणि त्यांच्याकडून गरब्यात मुस्लिम लोकांना प्रवेश नको, अशी भूमिका घेतली जात आहे. पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची पत्नी असलेल्या अमृता फडणवीस यांनी प्रवेश असायला हवा, अशी भूमिका घेतली. यापूर्वी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अमृता फडणवीस यांचे स्वतंत्र विचार आहेत, ते त्यांचे विचार आहेत.

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. अमृता फडणवीस यांनी म्हटले की, आपल्या धर्मात वेगवेगळे रंग आहे. जगात सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्माला मानलं जातं. ते लोक सर्व धर्माच्या लोकांचा समावेश आपल्या उत्सवात करतात. नवीन वर्षाचे ख्रिसमस असो त्यांनी लोकांना सेलिब्रेट करायला लावले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us