त्याचे हात पाय मोडल्यानंतर तुझा नंबर… भाजपा आमदाराची तरुणाला धमकी, ऑडिओ क्लिपने खळबळ..
राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये चक्क आमदारच हातपाय तोडण्याची धमकी देत आहेत. ही ऑडिओ क्लिप सुरेश धस यांची आहे.

आमदार सुरेश धस आणि एका मराठा आंदोलकाची सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप तूफान व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुरेश धस चक्क हातपाय तोडण्याची भाषा करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सोशल मीडियाचं काम पाहत असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाला आमदार सुरेश धस यांनी फोनवरून हात पाय मोडण्याची धमकी दिली आहे. याची कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. Tv9 मराठी या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही.
कॉल रेकॉर्डिंगमधील संवाद –
* आमदार सुरेश धस – तुम्ही पांढरीचेच आहात ना.
* तुला त्या मनोज चौधरीचा पुळका कशासाठी रे बाबा समाजासाठी काम करतो म्हणतो.
* मनोज चौधरी ने काय दिवे लावलेत समाजासाठी तू फोन केलता पाथरकर ला.
* मला चेहरा दाखव तुझा तू माझ्यासमोर आलेला आहे का कधी.
* तरुण : नाही अण्णा..
* तरुण : बाळासाहेब जरांगे पाटलाचं काम करतात मीही जरांगे पाटलाचं सोशल मीडियाचं काम करतो.
* तू सोशल मीडियाचं जरांगे पाटलाचं काम करतो आणि आमच्या आईला घोडा लावतो का ?
* तरुण : नाही अण्णा तसं काही नाही.
* तू समजतो काय स्वतःला.
* तरुण : तसं नाही अण्णा.
* माझ्या विरोधातल्या माणसांचा पुळका येतो तुला.
* त्याचं तो जय गोपीनाथ जय भगवान गड म्हणतो.
* आणि तू त्याला म्हणतो का हे समाजाचं काम करतो.
* असं जरांगे पाटलाचं काम करतो का तू
* तरुण : नाही अण्णा तसं काही मी बोलता बोलता म्हटलं..
* तू कोणाचा समर्थक आहे काय आहे मला माहिती आहे..
* आमच्या आईला घोडे लावणाऱ्यांना तू त्रास देऊ नका म्हणतो.
* मला तुला बघायचंय एका दिवशी
* तरुण : नाही नाही अण्णा तसं काही नाही.
* बाळासाहेब पाथरकर हा जरांगे पाटलाची बाजू घेतो तिकडे बजरंग सोनवणेची बाजू घेतो इकडं माझी बाजू घेतो.
* आणि तू त्याला सांगतो का मनोज चौधरी समाजाचं काम करतो.
* कुठलं समाजाचं काम केलं त्यानी..
* तुला लाज कशी वाटली नाही मनोज चौधरी समाजाचं काम करतो म्हणायची.
* त्यांनी कोणतं समाजाचं काम केलं रे त्याची यादी जरा मला पाठव तर.
* तरुण : नाही नाही अण्णा तसं काही नाही
* एका दिवशी त्याचे हात पाय मोडल्यानंतर तुझा नंबर लागू नाही.