Viral Girl Monalisa Bhosle: एका रात्रीत कुठे गायब झाली व्हायरल गर्ल मोनालिसा? फरमान खानशी लग्न अन् ‘लव्ह जिहाद’च्या वादात उद्ध्वस्त!
Viral Girl Monalisa Bhosle: महाकुंभ येथे माळा विकणारी व्हायरल गर्ल मोनालिसा गेल्या काही दिवसांपासून कुठे आहे आणि काय करते याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही. फरमान च्यासोबत लग्न केल्यानंतर तिच्यावर अनेकांना निशाणा साधला. आता 'लव्ह जिहाद' च्या आरोपांमुळे तिचं आयुष्या उद्ध्वस्त झालं... असं अनेकांचं म्हणणं आहे,

Viral Girl Monalisa Bhosle: महाकुंभमध्ये आपल्या डोळ्यांनी सर्वांवर राज्य करणारी मोनालिसा आता कुठे आहे आणि काय करते याबद्दल कोणाला काहीही माहिती नाही. एक काळ असा होता, तेव्हा तिची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतात. महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसा हिचं नशीब असं चमकेल आणि ती थेट मोठ्या पडद्यावर झळकेल असं कोणाला वाटलं देखील नव्हतं. पण मोनालिसा हिच्या आयुष्यात असा ट्विस्ट आला, ज्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. फरमान खान याच्यासोबत प्रेम, घरच्यांची नाराजी, पळून जाऊन केलेलं लग्न, ‘लव्ह जिहाद’चे आरोप, वयावरून झालेला वाद आणि त्यानंतर प्रेग्नेंसीमुळे मोनालिसा सतत चर्चेत राहिली. आता प्रश्न हा आहे की, महाकुंभातील ही मोनालिसा नेमकी कुठे आहे आणि सध्या काय करते? तिचं फिल्मी करिअर सुरू होण्याआधीच संपलं आहे की ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्याच्या तयारीत आहे?
सांगायचं झालं तर, मोनालिसाच्या आयुष्याला सर्वात मोठे वळण तेव्हा मिळालं, जेव्हा ती फरमान खानच्या प्रेमात पडली. या दोघांची भेट ‘नागम्मा’ या मल्याळम सिनेमाच्या पूजा समारंभादरम्यान झाली होती. फरमानने सांगितलं होतं की, तो या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारत होता, तर मोनालिस सिनेमातील अभिनेत्री होती. याच सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेमबहरलं आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं.
रिपोर्टनुसार, 11 मार्च 2026 रोजी दोघांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील एका मंदिरात लग्न केलं. लग्नापूर्वी मोनालिसा हिने पोलिसांकडे संरक्षणाची मागणीही केली होती. तिचा आरोप होता की, तिचे कुटुंबीय तिला तिच्या इच्छेविरुद्ध परत घेऊन जात होते. पण मोनालिसा हिने स्पष्ट नकार दिला. मोनालिसा आणि फरमानच्या लग्नाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला.
दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने काही लोकांनी या लग्नाला ‘लव्ह जिहाद’चं नाव दिलं. मोनालिसाच्या कुटुंबाकडूनही या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तिच्या वडिलांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवलं गेलं आहे.मात्र, मोनालिसा आणि फरमानने हे सर्व आरोप फेटाळून लावले. मोनालिसाने स्पष्टपणे सांगितलं की, त्यांचं लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार मंदिरात झाले आहे आणि दोघांपैकी कोणीही आपला धर्म बदललेला नाही.
फरमाननेही म्हटलं की, त्याच्यासाठी सर्व धर्म समान आहेत आणि त्याने मोनालिसाच्या इच्छेचा आदर केला आहे. मार्च 2026 मध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, मोनालिसाने स्वतः सांगितलं होतं की तिचे दोन दाक्षिणात्य सिनेमे पूर्ण झाले असून ते लवकरच प्रदर्शित होऊ शकतात. मोनालिसा तेलुगू अभिनेत्री कल्पलतासोबतही एका व्हिडीओमध्ये दिसली होती.
