कोर्टाबाहेरील थराराला 24 तास उलटत नाहीत तोवरच पुणे कोर्टाला पुन्हा..

पुणे कोर्टाबाहेर काल थरारक घटना घडली. ही घटना घडून 24 तास झाले नाहीत, तोवरच आता पुणे कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेल आला आहे. यामुळे पुणे कोर्टाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित राहिला आहे.

कोर्टाबाहेरील थराराला 24 तास उलटत नाहीत तोवरच पुणे कोर्टाला पुन्हा..
Pune court
| Updated on: Nov 26, 2026 | 1:25 PM

पुणे कोर्टाबाहेर धक्कादायक घटना घडून 24 तास उलटले नाहीत, तोवरच पुन्हा पुणे कोर्टाला धमकीचा मेल आला आहे. हा सलग तिसरा मेल आहे. कालच थेट कोर्टाबाहेर अशी घटना घडली, ज्याचा कोणीही साधा विचारही केला नव्हता. त्यातच आज पुन्हा धमकीचा मेल आला. थेट पुणे कोर्टाला वारंवार धमकीचा मेल येत असल्याने मोठा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. काल पुणे कोर्टाबाहेर थरारक घटना घडली. त्यातच पुन्हा धमकी मिळाली आहे. बॉम्बने उडून देण्याचे धमकीच्या मेलमध्ये लिहिले आहे. बॉम्ब शोधक पथक पुणे कोर्टात दाखल झाले. कोर्टात उपस्थित लोकांना बाहेर काढले जात आहे. पुणे कोर्ट परिसरात भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. मुंबई पाठोपाठ पुणे कोर्टाला धमकीचा मेल आला.

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य सत्र न्यायाधीश अंजू शेटे आणि पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यात बैठक पार पडली. पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील सुरक्षा उपाययोजनांच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. ही बैठक होताच धमकीचा पुन्हा मेल आला. पुणे जिल्हा न्यायालयातील 70 टक्के सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती मिळत आहे. पुणे जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आहे.

Loading...

वकील वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. सुरक्षेसाठी प्रवेशद्वारावर बसवलेले मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत आहे.  न्यायालयाच्या एकूण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी तब्बल 70 टक्के कॅमेरे बंद असल्याची माहिती आहे. मेट्रोच्या कामासाठी पाडलेली रेल्वे रुळालगतची सीमाभिंत अद्याप बांधली नाही. अनधिकृत प्रवेशाचा धोका अधिक यामुळे वाढला आहे.

न्यायालय परिसरात अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि अपुरा पोलीस बंदोबस्त आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत आरोपींच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींची मोठी गर्दी कोर्टात बघायला मिळते. पुणे जिल्हा न्यायालयाला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे दोनदा ई-मेल; पोलिसांकडून परिसराची तपासणी केली जात असतानाच तिसरा मेल आला.  न्यायालयाच्या सुरक्षा ऑडिटमधील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याची वकिलांची मागणी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us