AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Mandar Kiwale : मंदारचे हात कापल्यानंतर ‘बचके तू रहना रे..’ रिलची पुण्यात चर्चा, कोण आहे हा बब्या पवार?

Pune Mandar Kiwale : संपूर्ण राज्यात या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या न्यायाच्या मंदिराजवळच असे प्रकार होत असतील तर ते फार गंभीर आहे. मंदार किवळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.

Pune Mandar Kiwale : मंदारचे हात कापल्यानंतर 'बचके तू रहना रे..' रिलची पुण्यात चर्चा, कोण आहे हा बब्या पवार?
Mandar Kiwale
| Updated on: Nov 26, 2026 | 1:21 PM
Share

पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाबाहेर काल सर्वसामान्यांना हादरवून सोडणार थरार घडला. कोर्टाच्या परिसरात हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळेवर हल्ला झाला. आधी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. पण मिस फायरमुळे मंदार किवळे बचावला. त्यानंतर मंदार किवळेचा पाठलाग करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सहाजणांच्या टोळक्याने मिळून हे सर्व कांड केलं. त्यांनी मंदार किवळेवर कोयत्याने वार केले. त्यात मंदारचे हात शरीरापासून वेगळे झाले. दिड वर्षापूर्वी पुण्यात शुभम चव्हाणची हत्या झाली होती. मंदार किवळे हा त्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. नुकतच चार दिवसांपूर्वी 21 नोव्हेंबरला मंदार तुरुंगातून बाहेर आलेला. बुधवारी न्यायालयीन कामासाठी म्हणून तो शिवाजीनगर कोर्टात आला होता. त्यावेळी शुभमच्या भावानेच अक्षय चव्हाणने हा सर्व कट रचला. त्याने मंदारवर कोर्ट परिसरातच हल्ला घडवून आणला. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली.

संपूर्ण राज्यात या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या न्यायाच्या मंदिराजवळच असे प्रकार होत असतील तर ते फार गंभीर आहे. मंदार किवळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. कोयत्याने मंदारवर वार करण्यात आले. हल्लेखोर वार केल्यानंतर “शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला, आम्हीच कात्रजचे राजे आहोत” अशी घोषणाबाजी करुन कोयते हवेत फिरवत होते.

‘बचके तू रहना रे’

पुण्यातील या थरारक घटनेनंतर आता एक रिल समोर आली आहे. हल्ला होण्याच्या काहीदिवस आधी म्हणजे पाच दिवस आधी सोशल मीडियावर ही रिल पोस्ट करण्यात आली होती. ‘किंग ऑफ कात्रज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘बचके तू रहना रे’ या गाण्यासह रील पोस्ट करण्यात आली होती. ‘बचके तू रहना रे’ या गाण्यावरुन ही रिल करण्यात आलेली. ‘किंग ऑफ कात्रज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बब्या पवार याने ‘बचके तू रहना रे’ या गाण्याचा वापर करून रील पोस्ट केल्याचे दिसतंय. ही रील मंदार किवळेवरील हल्ल्याच्या पाच दिवस आधी पोस्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे या रीलची चर्चा सुरू झाली आहे. बब्या पवार याने ‘बचके तू रहना रे’ हे गाणं वापरुन ही रिल तयार केली होती.

Follow Us
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह
BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार