AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: सीतेनंच रावणाचा वध केला होता..; ‘रामायण’वरील वादात लेखक अमीश त्रिपाठी यांचं मोठं विधान

Ramayana: ‘रामायण’ चित्रपटात साई पल्लवीने साकारलेल्या सीतेच्या योद्धा रूपावरून चर्चा सुरू असतानाच लेखक अमीश त्रिपाठी यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘अद्भुत रामायण’मध्ये सीतेनंच रावणाचा वध केल्याचा उल्लेख असल्याचं त्यांनी सांगितलं.

Ramayana: सीतेनंच रावणाचा वध केला होता..; ‘रामायण’वरील वादात लेखक अमीश त्रिपाठी यांचं मोठं विधान
साई पल्लवी (रामायण)Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 26, 2026 | 1:10 PM
Share

Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यातील कलाकारांच्या भूमिका आणि चित्रपटातील प्रसंगांवरून चर्चा सुरू आहे. विशेषत: अभिनेत्री साई पल्लवीने साकारलेल्या सीतेच्या भूमिकेवर काही प्रेक्षक आणि कलाकारांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात सीतेला तलवार हातात घेऊन राक्षसांशी लढताना दाखवण्यात आलं आहे. मात्र सीता योद्धा नव्हती, तिला अशा प्रकारे दाखवणं चुकीचं असल्याचा दावा काहींनी केला. अभिनेता मुकेश खन्ना यांनीही या चित्रणावर प्रश्न उपस्थित केले होते. आता या वादात प्रसिद्ध लेखक अमीश त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीता ही नेहमीच एक योद्धा होती, असं म्हणत त्यांनी या आक्षेपांना उत्तर दिलं आहे.

‘अद्भुत रामायण’मध्ये सीतेनं केला होता रावणाचा वध

अमीष त्रिपाठी यांनी 2017 मध्ये ‘सीता- वॉरियर ऑफ मिथिला’ हे पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात त्यांनी सीतेचं योद्धा रुप मांडलं आहे. ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रामायणाच्या विविध आवृत्त्यांचा उल्लेख केला. त्यांच्या मते, अनेकांना रामायण आणि महाभारताच्या वेगवेगळ्या आवृत्यांची माहिती नसते. कारण शालेय शिक्षणात या महाकाव्यांचा सविस्तर अभ्यास केला जात नाही. अमीश यांनी ‘अद्भुत रामायण’चा संदर्भ देताना सांगितलं की, वाल्मिकींशी संबंधित मानल्या जाणाऱ्या रामायणाच्या विविध आवृत्त्यांपैकी ही एक आवृत्ती आहे. या कथेत रावणाचा एक अधिक शक्तिशाली मोठा भाऊ असल्याचा उल्लेख आहे. या अधिक शक्तिशाली रावणाचा वध सीतेनं केला होता. त्यामुळे सीता योद्धा होती, ही काही आधुनिक काळात निर्माण झालेली कल्पना नाही, तर प्राचीन कथांमध्येही तिच्या पराक्रमाचा उल्लेख आढळतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज

या मुलाखतीत अमीश त्रिपाठी यांनी भारतीय इतिहास आणि प्राचीन ग्रंथांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही भाष्य केलं. त्यांच्या मते, भारताचा इतिहास अनेकदा पाश्चिमात्य दृष्टिकोनातून शिकवला जातो. त्यामुळे भारतीय संस्कृतीतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि पूर्वजांचं योगदान पुरेशा प्रमाणात समोर येत नाही. प्राचीन भारतात शस्त्रक्रिया, जहाजबांधणी आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांत मोठी प्रगती झाली होती, असंही त्यांनी नमूद केलं. इतिहासातील तथ्य आणि कालांतराने कथांमध्ये जोडले गेलेले काल्पनिक घटक यांची योग्य माहिती असणं महत्त्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अमीश त्रिपाठी यांनी आपल्या पुस्तकातून सीतेचं धैर्यवान आणि सामर्थ्यशाली व्यक्तिमत्त्व मांडलं होतं. त्यामुळे ‘रामायण’ चित्रपटातील सीतेच्या योद्धा रूपाला त्यांनी प्राचीन साहित्याचा संदर्भ देत पाठिंबा दिला आहे. आता त्यांच्या या विधानामुळे चित्रपटातील सीतेच्या भूमिकेवर सुरू असलेल्या चर्चेला नवा आयाम मिळाला आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह
BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार
पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी