AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: मुंबईत राष्ट्रवादीत मोठी खलबतं, सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार हजर, ट्रॅक्टर मोर्चातून सरकारविरोधात ‘तुतारी’ फुंकणार?

Rohit Pawar NCP Meeting: विलिनीकरण, NDA मध्ये जाणार, रोहित पवार यांचा आंदोलनाचा सूर, एकटे पडल्याच्या चर्चा दरम्यान आज मुंबईत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह या बैठकीत आमदार रोहित पवारही उपस्थित आहेत. काय शिजतंय?

Rohit Pawar: मुंबईत राष्ट्रवादीत मोठी खलबतं, सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार हजर, ट्रॅक्टर मोर्चातून सरकारविरोधात 'तुतारी' फुंकणार?
मुंबईत राष्ट्रवादीत मोठी खलबतं, सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार हजर, ट्रॅक्टर मोर्चातून सरकारविरोधात 'तुतारी' फुंकणार?
| Updated on: Nov 26, 2026 | 1:02 PM
Share

Rohit Pawar NCP Meeting: महिनाभरापासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही राजकारणाच्या केंद्रबिंदु स्थानी आहे. राज्याचे राजकारण राष्ट्रवादीतील घाडमोडींशिवाय पुढेच सरकत नसल्याचे चित्र आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरणाचे गुऱ्हाळ बरेच दिवस लांबले. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला विधेयकावरून राष्ट्रवादी NDA जाण्याच्या चर्चा रंगल्या. तर त्यानंतर आमदार रोहित पवार यांची नाराजी, गुप्त बैठक, त्यांचे मोर्चे यावरून पक्षात धुसफुसीची चर्चा रंगली. काल परवा तर रोहित पवार यांनी गुप्त बैठक घेतल्याचाही दावा झाला. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पक्षाची बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीला खासदास सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार ही उपस्थित असल्याने राष्ट्रवादीत काय शिजतंय? याची खमंग चर्चा सुरू आहे.

ट्रॅक्टर मोर्चा निघणार?

गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार यांनी आंदोलनाची राळ उडवून दिली आहे. अजितदादांचे विमान अपघाताची चौकशी असो की MPSC विद्यार्थ्यांसाठी पुण्यात रस्त्यावर उतरणं असो. शेतकऱ्यांसाठी आणि इतर अनेक मुद्यांवर रोहित पवार ठसठशीतपणे राजकारणाच्या कॅन्व्हासवर दिसले. त्यांची ही जमेची बाजू सत्ताधाऱ्यांना खुपली नाही तर नवल. पण पक्षातूनही त्यांच्या या भूमिकेला विरोध होत असल्याची चर्चा रंगल्यावर सर्वांचा भुवया उंचावल्या. रोहित पवार हे वारंवार पक्षापासून फारकत घेत वेगळी भूमिका मांडत असल्याची चर्चा झाली.

आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते शेगाव ते नागपूरपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे समोर आले. पण हे सगळं करताना रोहित पवार पक्षाचं चिन्ह, पक्षाचा झेंडाच नाही तर पक्षाच्या वरिष्ठांचे फोटोही वापरत नसल्याने चर्चांना पेव फुटले. त्यातच काल परवा त्यांनी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक घेतल्याचा दावा समोर आला. हा दावा हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर आमदार रोहित पवार यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे सरकारकडून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवली.

4 डिसेंबरच्या मोर्चावर रोहित पवार ठाम

तर आज सुरू असलेल्या बैठकीत रोहित पवार हे 4 डिसेंबर रोजीच्या ट्रॅक्टर मोर्चावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनतेचे प्रश्न हिरारीने मांडले जावेत अशी भूमिका त्यांनी घेतली. शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या चर्चा केल्याचीही माहिती समोर येत आहे. आता शेगाव ते नागपूर असा ट्रॅक्टर मोर्चा निघणार का? आणि त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीला जयंत पाटीलही उपस्थित आहेत. तर अगोदर कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील अडचणी आणि पक्षीय भूमिका मांडली. आज दिवसभर ही बैठक चालणार आहे. त्यात सर्व विभागातील पदाधिकारी त्यांची बाजू मांडतील.

Follow Us
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार
पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राज
Shivsena : ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...