
Nashik News : सर्व सामन्यांची दिवाळी गोड (Diwali) करण्यासाठी शिंदे सरकारने ( Shinde Goverment) आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शंभर रुपयात आनंदाचा शिधा देखील मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात आनंदाचा शिधा पोहचला असून वाटप करतांना इंटरनेटचा अडथळा येत असल्याच्या बाबी समोर येत आहे. शहरी भागात ही प्रकिया सुरळीत सुरू असून ग्रामीण तसेच दुर्गम भागात ईपॉस मशिनला इंटरनेटचे संपर्क क्षेत्र मिळत नसल्याने आनंदाचा शिधा वाटण्यात अडथळा येत आहे. स्थानिक पातळीवर इंटरनेटची येणारी अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्याला फारसे यश येतांना दिसत नाहीये.
केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारने रेशन दुकानात सर्वसामान्य नागरिकांना विशेषतः पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहेत त्यांना लाभ दिला जात आहे.
केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजनेत कोरोनापासून बहुतांश नागरिकांना मोफत अन्नधान्य तर काहींना कमी दरात ही सुविधा दिली गेली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील सामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी याकरिता शंभर रुपयात चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला आहे.
शंभर रुपयात राज्य सरकार खादयतेल, रवा, चनदाळ व साखर या चार वस्तू रेशनदुकानात उपलब्ध करून देत असून त्याला आनंदाचा शिधा असे नाव देण्यात आले आहे.
राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप करत असतांना त्यासाठी टेंडर देखील काढले होते, टेंडर प्रणाली राबवून आनंदाच्या शिधा वाटप केला जात आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागात आनंदाचा शिधा पोहचला आहे. 80 टक्के किट रेशन दुकानदारांना प्राप्त देखील झाले असून वाटप सुरू आहे.
परंतु ग्रामीण आणि दुर्गम म्हणजेच आदिवासी भागात इंटरनेटचा अडथळा येत आहे, ईपॉस मशिनला इंटरनेट सेवा मिळत नसल्याने ही अडचण निर्माण होत आहे.