सकाळी पंजा छाटण्याचा इशारा, आता अनिल बोंडेंकडून पटोलेंचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका!

| Updated on: Jan 18, 2022 | 8:12 PM

नाना पटोलेंवर टीका करताना, बोडेंनी ट्विट करत, नान्या सापडला काय तो गावगुंड? सापडला असेल तर फटकन जावई करून घे कामात येईल काँग्रेसच्या, रॉबिन वाड्रा सारखा...असा घणाघात केला आहे.

सकाळी पंजा छाटण्याचा इशारा, आता अनिल बोंडेंकडून पटोलेंचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका!
नाना पटोलेंबद्दलची टीका अनिल बोंडे यांना भोवणार?
Follow us on

अमरावती : कालपासून राज्यात नाना पटोलेंच्या (Nana patole) वक्तव्यावरून जोरदार गदारोळ सुरू आहे. नाना पटोलेंचा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप (Bjp) नेत्यांनी आक्रमक होत टिकेची झोड उडवली आहे. फडणवीस म्हणतात, उंची वाढली म्हणून बुद्धी वाढत नसते, तर काही भाजप नेते म्हणतात हा मोदींच्या हत्येचा कट आहे. त्यामुळे राज्याच जोरदार पॉलिटल राडा सुरू झाला आहे. भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil bonde) यांनीही नाना पटोलेंवर टीकेची झोड उडवली आहे. त्यांनी नाना पटोलेंना सकाळी थेट पंजा छाटण्याचा इशारा दिला होता, आता तर थेट नान्या गुंडाला जावाई करून घे अशी जहरी टीका केली आहे. त्यामुळे बोंडेंच्या या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तर काही वेळापूर्वीच नाना पटोले यांनी भाजपवर पुन्हा पलटवार केला आहे.

अनिल बोंडेंचं ट्विट काय?

नाना पटोलेंवर टीका करताना, बोडेंनी ट्विट करत, नान्या सापडला काय तो गावगुंड? सापडला असेल तर फटकन जावई करून घे कामात येईल काँग्रेसच्या, रॉबिन वाड्रा सारखा…असा घणाघात केला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आक्रमक पवित्रा घेण्याची दाट शक्यता आहे. बोंडेंनी टीका करताना नाना पटोलेंना नान्या म्हणत, त्यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. नाना पटोलेंच्या त्या वक्तव्यावरून राज्यात सध्या भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहे.

सकाळी पंछा छाटीन, आता पुन्हा जहरी टीका

काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. “नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली. पण, नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल.”, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव, असा इशारा बोंडे यांनी सकाळी दिला होता.

Goa Assembly Election : गोव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी नाहीच, आता राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार? पटेल, आव्हाड काय म्हणाले?

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का? मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती? चित्रा वाघ यांचा सवाल

नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा, भाजप शिष्टमंडळांचं राज्यपाल कोश्यारींना निवेदन; कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा