AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर सकारात्मक चर्चा करु, अनिल परब यांचे आश्वासन 

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्द्याबाबत दिवाळीनंतर राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर सकारात्मक चर्चा करु, अनिल परब यांचे आश्वासन 
ST Strike And ANIL PARAB
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 1:18 AM
Share

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्द्याबाबत दिवाळीनंतर राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले. आज एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  अनिल परब यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांच्या मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर परब यांनी वरील आश्वासन दिले.

कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे

यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनसाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पूर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता व दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनासोबत देण्यात आले, असे परब यांनी दरेकरांना सांगितले. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शासनाचे व परिवहन मंत्री महोदय यांचे आभार मानले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वर कोणतीही कारवाई करु नका, अशी विनंती देखील त्यांनी परिवहन मंत्र्यांना केली. या बाबतीत बोलताना मंत्री परब म्हणाले की, “आजअखेर अघोषित संपावर असलेल्या कोणते कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही,” तसेच तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे व सर्व सामान्य जनतेची गैरसोय टाळावी. असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप 

मान्यताप्राप्त संघटनांनी एसटी कामगारांची दिशाभूल केल्याचा आरोप करत सांगली आगारातील अनेक कर्मचारी 3 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनावर आहेत. यापूर्वी सर्वच आंदोलक एसटी कामगारांनी नियंत्रकांना निवेदन देत  कामबंद आंदोलनाची हाक दिली  होती. या आंदोलनात भाजपाचे नेते सहभागी झाले होते. एसटीचे विलिनीकरण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला होता

खूशखबर! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट देणार, श्री शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

पेट्रोल, डिझेलवरील Excise Duty म्हणजे नेमकं काय?, ज्यातून सरकारची दररोज करोडोंची कमाई

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं