मराठा आरक्षण आंदोलनात अण्णा हजारेंची उडी; मनोज जरांगे यांना दिला महत्त्वाचा सल्ला

मराठा आरक्षण आंदोलनावर अण्णा हजारेंनी महत्वाचं भाष्य केलं. तर हजारे यांनी मनोज जरांगे यांना महत्त्वाचा सल्ला दिला. जाणून घ्या अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले...

मराठा आरक्षण आंदोलनात अण्णा हजारेंची उडी; मनोज जरांगे यांना दिला महत्त्वाचा सल्ला
Anna hajare news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 3:03 PM

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. जरांगे यांनी उपोषण करत मराठा-कुणबी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टरांकडून उपचार नाकारले होते. परंतु सरकारच्या प्रतिनिधीच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास सुरूवात केली. त्यांनी डॉक्टरांकडून सलाइन लावून घेतली. तेरा दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे यांच्या वजनातही घट झाली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांचा अनुभव देखील सांगितला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली अण्णा हजारे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आज गुरुवारी अण्णा हजारे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी  मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी हजारे यांनी मनोज जरांगे यांना महत्वाचा सल्ला दिला.

अण्णा हजारे यांनी म्हटलं की, माझी तब्बेत एकदम ठणठणीत आहे. डॉक्टरांनी चांगले उपचार केले’.  तर अण्णा हजारे यांनी मराठा आरक्षणावर म्हटलं की, मी आयुष्यात २२ उपोषण केले. उपोषणामुळे तब्बेत ठणठणीत राहते. उपोषण हे समाजासाठी, देशासाठी असले पाहिजे. आयुष्यभरात मी उपोषणे करून १० कायदे मंजूर करून घेतले’.

अमृत फडणवीसांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे काय म्हणाले?

अमृता फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाऊ असं संबोधले. अमृता फडणवीसांच्या विधानाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना घरी जेवायला यावे, अशी इच्छा अमृता फडणवीस यांनी नागपुरातून व्यक्त केली होती.त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सोडीचोळी घेऊन अमृताताईंना भेटणार असल्याचे जरांगेंनी सांगितले. त्याचबरोबर संकटाच्या काळात बहिणीने बावाला पाठिंबा द्यावा, असे जरांगे यांनी म्हटलं .

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us