Woman Swallows 13 Pens : महिलेच्या पोटात 13 पेन, मेणबत्ती अन् लाकडी चमचे; डॉक्टरही अवाक, नेमकं काय घडलं?
Woman Swallows Pens : आंध्र प्रदेशातील नरसारावपेटमध्ये पोटदुखीच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या महिलेसोबत घडलेल्या प्रकाराने डॉक्टरांनाही धक्का बसला. एंडोस्कोपी आणि सीटी स्कॅननंतर तिच्या पोटात अनेक वस्तू असल्याचं समोर आलं.

महिलेला पोटात प्रचंड वेदना होत होत्या. ती वेदनेनं विव्हळत होती. भयानक त्रासात असलेली महिला हॉस्पिटलला पोहोचली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरु केले. सुरुवातीला कोणालाचा काहीही अंदाज नव्हता की या महिलोसोबत नेमकं काय झालंय? परंतू उपचार सुरु केल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. एंडोस्कोपी केल्यानंतर डॉक्टरांचे डोळे पांढरे झाले. त्यांनी तिच्या पोटात अशा काही वस्तू पाहिल्या की, सगळे कर्मचारी थक्का झाले. महिलेनं असं काय केलं होतं, आणि तिच्या पोटात नेमंक होत तरी काय? याबद्दल जाणून घेऊयात.
सदरील घटना ही आंध्र प्रदेशातली आहे. नरसारावपेट येथील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महिला पोटदुखीची समस्या घेऊन हॉस्पिटलला पोहोचली. डॉक्टरांना सुरुवातीला महिलेची ही तक्रार सामान्य वाटली. किरकोळ दुखापत असेल असं समजून डॉक्टरांनी उपचार सुरु केले. त्यांनी तपासणी करताना इसीजी आणि एंडोस्कोपी केली. यावेळी इसीजीचा अहवाल सामान्य आला होता. परंतू एंडोस्कोमीमध्ये पोटात लहान लांब काडीसारख्या वस्तू आढळून आल्या. तिच्या पोटात नेमकं काय आहे, हे अधिक सुस्पष्टपणे समजून घेण्यासाठी डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचे ठरवले. त्यानंतर महिलेच्या पोटातील वस्तूंची पुष्टी झाली. डॉक्टरांनी लगेचच उपचारांना सुरुवात केली. तिच्या पोटातील वस्तू काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. रामचंद्र रेड्डी यांनी सांगितलं की, 25 सेंटीमीटर लांबीच्या पेनमुळे महिलेच्या पोटात गंभीर जखम झाली. यामुळे न्यूमोमेडियास्टिनमसारखी गुंतागुंत निर्माण झाली. परिस्थिती लक्षात घेऊन, डॉक्टरांनी एंडोस्कोपी आणि लॅपरोस्कोपीद्वारे पोटातील वस्तू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली. उपचारादरम्यान, डॉक्टरांना असे आढळून आले की त्या महिलेने केवळ एक-दोन नव्हे, तर अनेक वस्तू गिळल्या होत्या.
तिच्या पोटातून तब्बल 13 पेन, एक मेणबत्ती आणि पाच लाकडाचे चमचे बाहेर काढण्यात आले. हे सगळं पाहून डॉक्टर अवाक झाले. त्यांच्यासाठीही असा प्रकार असामान्य होता. दरम्यान, वस्तू काढल्यानंतर आता महिलेची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ती सध्या वैद्यकिय पथकाच्या निगराणीत आहे.
वर्षभरापूर्वी या महिलेने 4 पेन गिळल्याची कबुली दिली. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या वडिलांसोबत झालेल्या वादामुळे तिने हे कृत्य केलं होतं. तेव्हाही डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करुन पेन बाहेर काढले होते. त्यानंतर तिला मानसिक आरोग्य तज्ञांकडे पाठवण्यात आले. परंतू आता पुन्हा तशीच घटना घडल्याने डॉक्टर आणि कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, अशाप्रकारे कोणत्याही वस्तू गिळणे जिवावर बेतू शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
